आमदार राऊतांना बारबोले देणार धक्का : पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

बारबोले यांच्या या निर्णयामुळे गेली ११ वर्षांपासून एकत्र असणाऱ्या आमदार राऊतांसाठी विधानसभेची वाट खडतर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चिली जात आहे.
Rajendra Raut-Vishwas Barbol-Sharad Pawar
Rajendra Raut-Vishwas Barbol-Sharad PawarSarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शीचे (Barshi) माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आणि त्यांचे सुपुत्र माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले हे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत येत्या जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बारबोले यांनी घेतला आहे. त्यामुळे गेली काही महिन्यांपासून बारबोले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. बारबोले यांच्या या निर्णयामुळे गेली ११ वर्षांपासून एकत्र असणाऱ्या आमदार राऊतांसाठी विधानसभेची वाट खडतर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चिली जात आहे. (Vishwas Barbole will join NCP in the presence of Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विश्वास बारबोले यांच्या निवासस्थानी भेट देत स्नेहभोजन घेतल्यापासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांची खुद्द शरद पवार यांच्यासोबतही भेट झाली होती. त्या भेटीगाठीतूनच जून महिन्यातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे.

Rajendra Raut-Vishwas Barbol-Sharad Pawar
महेश कोठे यांच्या मोबाईलवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ची हॅलो टोन

बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल हे कट्टर पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेकदा आपला पक्ष हा शरद पवार पक्ष असल्याचे जाहीरपणे सांगितलेले आहे. मात्र, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी सोपलांनी राष्ट्रवादीची साथ सोडत शिवबंधन हाती बांधले होते. तेव्हापासून बार्शीत राष्ट्रवादी कमजोर झाली होती. त्या परिस्थितीत निरंजन भूमकर यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनी सभा घेत आपल्या जुन्या सहकाऱ्याचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता.

Rajendra Raut-Vishwas Barbol-Sharad Pawar
सरकारी नोकरदार सोसायटी : फुटीर संचालकांना मतदानापासून रोखण्यासाठी हाणामारी

सोपल आणि आमदार राऊत यांच्यात तीव्र स्पर्धा असताना राष्ट्रवादीला बार्शीत सक्षम नेतृत्वाची गरज होती. तसेच बारबोले यांना गॉडफादारची आवश्यकता होती. त्यामुळे गेली दशकभर शांत असलेल्या बारबोले गटाने आता तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बार्शी शहरात बारबोले गटाची ताकद नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत नेहमीच निर्णायक राहिली आहे. राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठबळ मिळाले आहे. राजकारणातील अनुभव, जुन्या सहकारी गोळाबेरीज आणि चिरंजीव कृष्णराज यांच्या माध्यमातून युवकांची मोर्चेबांधणी करत बारबोले गट आता सोपल आणि राऊत यांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरणार आहे.

Rajendra Raut-Vishwas Barbol-Sharad Pawar
तुम्ही काय दादा लागून गेलात का? वीजप्रश्नावरून आमदार आवताडे संतापले!

बारबोले यांच्या गटाने बार्शीच्या नगराध्यक्षपदापासून संतराज साखर कारखान्याच्या अध्यक्षपदापर्यंतची सर्व पदे भूषविली आहेत. अनेकदा यश दृष्टीक्षेपात असूनही नशिबाने त्यांना हुलकावणी दिली आहे. राजकीय गॉडफादरच्या अभावी बारबोले गटाने धाडसी पवित्रा घेण्याचे गेली दशकभर टाळले होते. मात्र, राज्याच्या राजकारणाची सूत्रे हाती ठेवणाऱ्या पवार काका-पुतण्यांचा आशीर्वाद मिळाल्याने बारबोले गटही जोमाने मैदानात उतरला आहे. सध्या आमदारकीपासून पंचायत समितीपर्यंत तालुक्यातील सर्व सत्ता केंद्रे राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात आहेत. ते आपल्या राजकीय वाटचालीसाठी चांगले नसल्याचे ओळखून राऊतांना धक्का देण्याची तयारी बारबोले गटाने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com