फटेचा भाऊ अन्‌ वडिलांनी कोर्टाला सांगितले, ‘आम्ही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत; सर्वकाही विशाल पाहायचा’!

फटे याने कोणत्या कंपनीत कोणत्या योजनेत कशा पध्दतीने गुंतवणूक केली आहे, त्याबाबतचा कागदोपत्री पुरावा, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे हस्तगत करावयाचे आहेत.
Vishal phate
Vishal phatesarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : जादा परताव्याच्या अमिषाने बार्शीसह (barshi) राज्यभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा विशाल फटे (vishal phate) सध्या पोलिस कोठडीत. याचप्रकरणात त्याचे वडिल अंबादास गणपती फटे आणि भाऊ वैभव अंबादास फटे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना आज (ता. २० जानेवारी) बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांनी ‘या प्रकरणी आम्हाला काहीही माहिती नाही, आम्ही कोणाकडूनही पैसे स्वीकारले नाही, सर्वकाही विशालच पाहायचा,’ असे सांगितले. दरम्यान या दोघांना ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयानी कोठडीत ठेवण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी दिला. (Vishal phate's father and brother remanded in judicial custody in Barshi scam)

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संशयीत आरोपी वैभव फटे व अंबादास फटे यांना न्यायालयात उभे करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. त्यात सरकारी वकील ॲड. प्रदीप बोचरे यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला. सोलापूर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात सोमवारी (ता. १० जानेवारी) रात्री विशाल फटे स्वतः हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यास 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद दीपक अंबारे यांनी 14 जानेवारी रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली होती.

Vishal phate
विशाल फटेला या कारणामुळे कोर्टात उशिरा उभे केले...

दरम्यान, विशालचे वडिल आणि भावाने या प्रकरणाची कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांनी कोर्टात सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे कोणाकडूनही स्वीकारलेले नाहीत. विशाल हा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करीत असून त्याबाबत आपणास ज्ञान नाही. विशाल यालाच सर्वकाही माहिती आहे.

Vishal phate
रिक्षातून SP ऑफिसमध्ये पोचला अन्‌ म्हणाला ‘मी विशाल फटे...’ : पोलिसांनीच ओळखले नाही!

तीन वित्तीय अस्थापनेमध्ये गुंतवणूक करण्याकरिता जादा रकमेचे आमिष दाखवून नागरिकांनी दिलेली रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे, असे विशाल फटे सांगून रक्कम स्वीकार होता. दहा लाख रुपयांचे वर्षअखेरीस 6 कोटी रुपये देण्यात येतील, असे एक पत्रक काढून लोकांना आकर्षित करुन मोठ्या प्रमाणातील रकमेचा अपहार करुन संगनमताने फसवणूक केली आहे. तीन कंपन्यांची मूळ कागदपत्रे तसेच फटे याने कोणत्या कंपनीत कोणत्या योजनेत कशा पध्दतीने गुंतवणूक केली आहे, त्याबाबतचा कागदोपत्री पुरावा, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे हस्तगत करावयाचे आहेत, असे सरकारी वकिलांनी आपल्या युक्तीवादात म्हटलेले आहे.

Vishal phate
विशाल फटेला बार्शीच्या कोर्टात उभे केले आणि त्याचे वकिल म्हणाले....

दरम्यान, या फसवणूकप्रकरणी आत्तापर्यंत 46 साक्षीदारांकडे तपास करण्यात आला आहे. वेगवेगळ्या बँकांना पत्रव्यवहार करण्याचे कामकाज सुरु आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस उपअधीक्षक संजय बोठे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. बार्शी शहरात सबजेलमध्ये ठेवण्यात आलेल्या संशयीत आरोपींपैकी एक संशयीत आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com