विशाल फटेला या कारणामुळे कोर्टात उशिरा उभे केले...

बार्शी पोलिसांत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने त्याला बार्शीतील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
Vishal Fate
Vishal Fatesarkarnama

सोलापूर : बार्शी (barshi) आणि राज्यभरातील शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरारी झालेला विशाल फटे (vishal phathe) हा सोमवारी रात्री उशिरा सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यालयात पोलिसांना शरण गेला. मात्र, सकाळी किंवा दुपारच्या सत्रात न्यायालयाच्या आवारात बघ्यांची, तक्रारदारांची मोठी गर्दी होऊ शकते, असा पोलिसांना अंदाज होता, त्यामुळे त्याला उशिराने न्यायालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. (Vishal Fate was taken to court late for this reason)

जादा परताव्याच्या अमिषाने विशाल फटे याने बार्शी तालुक्यासह राज्यभरातील शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्या प्रकरणी त्याला बार्शीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फटे हा सोमवारी (ता. 17 जानेवारी) रात्री साडेआठच्या सुमारास हा स्वत: पोलिस अधीक्षकांसमोर हजर झाला होता. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला तालुका पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला बार्शीला हलविण्यात आले. बार्शी पोलिसांत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने त्याला बार्शीतील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

Vishal Fate
विशाल फटेला बार्शीच्या कोर्टात उभे केले आणि त्याचे वकिल म्हणाले....

दरम्यान, अटकेनंतर 24 तासांत त्याला कधीही न्यायालयात हजर करणे बंधनकारक असते. पोलिसांनी त्याला सायंकाळी पाचनंतर कोर्टात दाखल केले. सकाळी अथवा दुपारच्या सत्रात न्यायालयाच्या आवारात बघ्यांची, तक्रारदारांची मोठी गर्दी होऊ शकते, असा पोलिसांना अंदाज होता. त्यामुळे त्याला उशिराने न्यायालयात नेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Vishal Fate
रिक्षातून SP ऑफिसमध्ये पोचला अन्‌ म्हणाला ‘मी विशाल फटे...’ : पोलिसांनीच ओळखले नाही!

...अन्‌ विशाल फटे प्रकटला

बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने विशाल फटे याला सर्वसामान्यांना ज्यादा पैशांचे अमिष देऊन स्वत:च्या तीन कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवायला भाग पाडले. त्यानंतर काही दिवस त्यांना वाढीव फायदाही दिला. मात्र, त्यानंतर त्याने जिल्ह्यातील जवळपास 50 जणांचे साडेआठरा कोटी रुपयांची रक्‍कम परत दिलीच नाही. त्यामुळे दीपक आंबुरे यांनी त्याच्याविरुध्द फिर्याद दिली आणि तो पत्नी व मुलीसह पसार झाला. मात्र, माध्यमांतील बातम्या पाहून त्याने सोमवारी व्हिडीओच्या माध्यमातून आपण पोलिसांपुढे हजर राहणार असल्याचे सांगितले.

Vishal Fate
खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

तपास कुठे होणार

व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार तो सोमवारी स्वत:हून पोलिसांना शरण आला आणि पोलिसांनी त्याला आज (मंगळवारी) न्यायालयात हजर केले. आता त्याला बार्शी पोलिस ठाण्यात ठेवून चौकशी करायची की तालुका पोलिस ठाण्यात की आणखी कुठे, त्याबद्दल उद्या (बुधवारी) निर्णयाची शक्‍यता आहे. सोयीच्या ठिकाणी त्याची सखोल चौकशी होईल, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले. फसवणूक केलेली रक्‍कम त्याने कुठे गुंतवली की कोणाला दिली, इतके दिवस सुरळीत व्यवहार सांभाळणारा फटे कोणोमुळे अडचणीत आला, त्याचे नेमके कारण काय, यासह अन्य बाबींचा सखोल तपास दहा दिवसांत केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com