फटेकडून फसवणुकीची सुरुवात बारावीपासूनच... आई म्हणून 'मेस'मधील महिलेला केले उभे!

बार्शीतील विशाल फटे फसवणूक प्रकरणी ७६ जणांकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
vishal Fate
vishal Fatesarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शीसह (barshi) राज्यभरातील हजारो नागरिकांना जादा परताव्याच्या अमिषाने गंडविणाऱ्या विशाल फटे (vishal Fate) याची फसवणुकीची चलाखी जुनीच आहे. बारावीत असल्यापासूनच त्याने फसवाफसवीला सुरुवात केल्याचे तपासात पुढे आले आहे. पुण्यात असताना इयत्ता बारावीत गणित विषयात पहिला आल्यानंतर त्याने आई म्हणून चक्क खानावळीतील महिलेला महविद्यालयात घेऊन गेला होता. त्या ठिकाणी त्याने पुरस्कार स्वीकारला होता. (vishal fate fraud case : 76 people lodge police complaint in Barshi)

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शेकडो नागरिकांना गंडा घालून पसार झालेल्या विशाल फटे याने पोलिसांची मात्र झोप उडवली आहे. कारण, फटेच्या फसवणुकीचा प्रताप केवळ बार्शी तालुक्यापुरता मर्यादी राहिला नसून इतर तालुक्यांसह राज्यभरातील लोकांच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ७६ जणांनी तक्रार दिली असून फसवुणकीचा आकडा १८ ते १९ कोटींच्या घरात गेला आहे. मात्र, त्याने राज्यभरात अनेकांना गंडविल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

vishal Fate
बार्शीकरांना लुटणाऱ्या फटेच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल!

फसवणुकीचे धागेदारे निपाणीपर्यंत

विशाले फटे यांनी जादा परताव्याच्या अमिषाने राज्यातील इतर जिल्ह्यांत कमिशन एजंट नेमून पैसे गोळा केले असल्याचे समोर येत आहे. शेकडो नागरिकांनी रोख रक्कम आणून विशाल फटेच्या ताब्यात दिली आहे. तो या रक्कम मोजण्यास वेळ घालवत नव्हता, तशीच कपाटात ठेवत असे, असे आज अनेक जण सांगत आहेत. पुण्याच्या खराडीत कार्यालय उघडून तेथे एकाला कामाला ठेवून कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत, तर वाघोली (पुणे) येथील फसवणूक झालेले नागरिकही पोलिसांच्या संपर्कात आले आहेत. चाळीसगाव, कोल्हापूर, कर्नाटकमधील निपाणी येथीलही नागरिकांना त्याने गंडवले आहे. त्यांचीही तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

vishal Fate
राजन पाटलांच्या शब्दाला आजही मान; मग कामे का होत नाहीत : उमेश पाटलांचा सवाल

शेअर मार्केटच्या नुसत्याच थापा...

विशाल फटे याने तीन वित्तीय संस्था स्थापन करुन शेअर मार्केटचा व्यवहार करतो, अशी थाप मारत पैसे घेऊन फसवले आहे. प्रत्यक्षात त्याने कोणाचेही शेअर मार्केटमध्ये खातेही उघडले नाही. स्वतःच्या खात्यावरुन व्यवहार करीत असे. सामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना बँका पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर पूर्वसूचना द्या, असे सांगतात पण फटे याने एकाच दिवसात पन्नास लाख ते एक कोटी रुपयांपर्यतची रक्कम काढली आहे.

vishal Fate
जयंतरावांची बातच न्यारी! थेट एलॉन मस्कला धाडलं आमंत्रण

४१ लाखांची अलिशान कार पळवली

विशाल फटे याच्या मित्राने 41 लाख रुपयांची अलिशान चारचाकी मोटार बुक केली होती. ती अलिशान कार फटे याने स्वतःच्या वाढदिवशी रोख पैसे भरुन आणली होती. शेतात ठेवलेली ती कार पाहण्यासाठी गर्दी व्हायची. मात्र, फटेचे पितळ उघडे पडल्यानंतर एका गुंतवणूकदाराने तेथून ही कार नेल्याची चर्चा आहे. शिवाय फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्याच्या ऑफिसमधील कॉम्प्यूटर, इतर सामान लंपास केले आहे, तर घर फोडून घरातील पंखे, एसी यासह अन्य चीजवस्तूही पळवल्या आहेत. विशाल फटे याच्याकडे फक्त स्वतःचा पासपोर्ट असून पत्नी व मुलीचा नाही, त्यामुळे तो परदेशात पळून जाऊ शकत नाही. जेथे पासपोर्टची गरज नाही, अशा शेजारच्या देशात जाऊन तो लपू शकतो. पण आम्ही लवकरच त्याला ताब्यात घेऊ, असा विश्वास पोलिसांकडून दिला जात आहे.

फसवणुकीच्या धक्काने अनेकांनी धरली हॉस्पिटलची वाट

अनेकांनी स्वतःचे घर, दागिने गहाण ठेवून, व्याजाने पैसे काढून मोठी रक्कम फटेकडे गुंतवणूक केली आहे. फसवणुकीमुळे अनेकांना धक्का बसला आहे, तर काहींजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. किमान पाचशे कोटींपेक्षा जास्त रकमेचे हे फसवणूक प्रकरण असल्याची चर्चा आहे. फटे याचे वडिल प्राध्यापक. आर्थिक परिस्थिती बेताचीच. बार्शीतील कॉलेज रोडला कॅफे टाकून दिले. पण, ग्राहक नसताना निवांत वेळेत शेअर मार्केटचा उपक्रम त्याने सुरु केला, त्यातून स्वतः तो गुंतवणूक करीत होता. नेट कॅफेमध्ये रोज पाचशे ते हजार रुपये मिळवण्यापेक्षा शक्कल लढवून विशाल फटेने योजना आखल्या. नेट कॅफे भावाकडे दिले अन् तीन वर्षांत विश्वास संपादन करुन कोट्यवधीची माया गोळा केली. बारावीनंतर विशाल फटे याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली होती. इंग्रजीवर बऱ्यापैकी प्रभुत्व असल्याने एखादा माणूस त्याला भेटला की फसलाच, असे त्याचे वागणे असायचे, त्याच स्वभावातून अनेकांना गंडा घालून तो फरारी झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com