Bharat Jodo : विक्रमादित्य देशमुखांनी राहुल गांधींना दिली अनोखी भेट....

श्री. चव्हाण Prithviraj chavan यांनी सोनिया गांधी Soniya Gandhi यांना चार वर्षाच्या विक्रमादित्याची ओळख करून दिली होती, तेव्हा सोनिया गांधीनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचे कौतुक केले होते.
Rahul Gandhi, Vikramaditya Deshmukh
Rahul Gandhi, Vikramaditya Deshmukhsarkarnama

निमसोड : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत खटाव माणचे युवा नेते विक्रमादित्य देशमुख यांनी लक्षवेधी भेट दिली. या भेटीने राहुल गांधी भावनिक झाले. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने त्यांनी विक्रमादित्य यांचे कौतूक केले.

19 ऑक्टोंबर 2003 मध्ये दुष्काळी परिस्थितीत माण खटावचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी चारा छावण्या उभा केल्या होत्या. यावेळी कातरखटाव (ता.खटाव) येथील छावणीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिली होती. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

या भेटीच्या दरम्यान विक्रमादित्य चार वर्षाचे होते. श्री. चव्हाण यांनी सोनिया गांधी यांना चार वर्षाच्या विक्रमादित्याची ओळख करून दिली होती, तेव्हा सोनिया गांधीनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचे कौतुक केले होते.

Rahul Gandhi, Vikramaditya Deshmukh
Bharat Jodo : फुले पगडी घालून राहूल गांधी म्हणाले, सिर पर सम्मान है महाराष्ट्र का....

भारत जोडो यात्रेत विक्रमादित्य देशमुख यांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली. तेव्हा या क्षणाचा फोटो त्यांना भेट दिला. यानिमित्ताने सलग तीन पिढ्याशी असलेले निमसोडच्या देशमुख घराण्याचे काँग्रेसशी ऋणानुबंध पाहून राहुल गांधी भारावून गेले.

Rahul Gandhi, Vikramaditya Deshmukh
Bharat Jodo Yatra : राहूल गांधींसोबत पृथ्वीराजबाबा चार किलोमीटर चालले....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in