मिलिंद नार्वेकरांबरोबर दिसले दोन्ही विखे : अनेकांच्या भुवया उंचावल्या

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) व विखे पिता-पुत्रांची भेट झाली.
Radhakrishna Vikhe Patil, Dr. Sujay Vikhe Patil & Milind Narvekar
Radhakrishna Vikhe Patil, Dr. Sujay Vikhe Patil & Milind NarvekarSarkarnama

अहमदनगर : मोठे राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील विवाहाला मोठी गर्दी होते. या कार्यक्रमांना मोठ्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती असते. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात निलांजना झेंडे व आदित्य माने यांच्या विवाहाच्या रिसेप्शनला राज्यातील सर्व पक्षीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. मात्र या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) व विखे पिता-पुत्रांची भेट. या भेटीमुळे राजकीय अनेक राजकीय कयास लढविले जात आहेत. ( Vikhe with Milind Narvekar: Raised eyebrows of political analysts )

माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात व म्हाडातील निवृत्त अधिकारी संभाजी झेंडे यांची कन्या निलांजना आणि आदित्य माने यांच्या विवाह 24 मार्चला पुण्यात झाला होता. या विवाहाचे रिसेप्शन 3 एप्रिलला होणार होते. मात्र काही कारणास्तव हे रिसेप्शन काल ( मंगळवारी ) सायंकाळी मुंबई येथे झाले. या रिसेप्शनसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील दिल्लीतील अधिवेशन सोडून काही कालावधीसाठी मुंबईत आले होते.

Radhakrishna Vikhe Patil, Dr. Sujay Vikhe Patil & Milind Narvekar
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

या रिसेप्शनला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, मिलिंद नार्वेकर यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. संभाजी झेंडे यांनी स्वतः मंत्रालयात नोकरी केली असल्याने त्यांचे राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. विधानसभेच्या अधिवेशनामुळे अनेकजण या विवाह समारंभात उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मुंबईत रिसेप्शन ठेवण्यात आल्याचे समजते.

Radhakrishna Vikhe Patil, Dr. Sujay Vikhe Patil & Milind Narvekar
video: राष्ट्रवादी पती,शिवसेना मूक पत्नी तर काँग्रेस न बोलावलेले वराती...

या कार्यक्रमात मुलीचे मामा असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांशी भेट झाली. मुलीचे मामा या नात्याने राधाकृष्ण विखे पाटलांनी नार्वेकरांचे स्वागत केले. त्यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटीलही त्यांच्या समवेत होते. त्यांच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोतून महाराष्ट्रात काही नवीन राजकीय हलचाली चालल्या नाहीत ना यावर उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com