अमित शाहंना विखे-पाटील महाराष्ट्रातील सहकार समजावून सांगणार...

भेटीत अमित शाह सहकाराविषयी राजकीय भाष्य काय करणार याची उत्सुकता असणार आहे.
अमित शाहंना विखे-पाटील महाराष्ट्रातील सहकार समजावून सांगणार...
Amit ShahSarkarnama

पुणे : सहकार मंत्री म्हणून काम सुरू केल्यानंतर केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह येत्या २६ नोव्हेंबरला पुणे तर २७ ला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून सहकारची पंढरी मानल्या जाणाऱ्या प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत.विखे-पाटील यांनी आयोजित केलेली सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सहकारमंत्री म्हणून अमित शाह महाराष्ट्रात पहिली भेट वैकुंठभाई मेहता संस्थेस देणार आहेत.दुसरी भेट प्रवरानगरला आहे.या भेटीत अमित शाह सहकाराविषयी राजकीय भाष्य काय करणार याची उत्सुकता असणार आहे.

Amit Shah
आयुक्तांच्या बडग्यानंतर २१ कारखान्यांकडून ‘एफआरपी’ जमा

विठ्ठलराव विखे-पाटील यांनी राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सुरू केला.त्यामुळे त्यांना सहकारी साखर कारखानदारीचे जनक मानले जाते.सहकार मंत्री झाल्यानंतर शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुण्याबरोबरच प्रवरानगरला भेट देणार आहेत.२६ नोव्हेंबरला पुण्यातला दौरा आटोपून २७ ला सकाळी प्रवरानगरला जाणार आहेत.तेथे विठ्ठलराव विखे-पाटील व बाळासाहेब विखे-पाटील यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. कारखाना स्थळावर शेतकरी मेळावा व सहकार परिषद आयोजित केली आहे. या दोन्ही कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून शाह उपस्थित राहणार आहेत.

Amit Shah
शरद पवार यांचे निमंत्रण अमित शाहंनी स्वीकारले की नाही ?

प्रवरानगरला जाण्यासाठी शाह २७ नोव्हेंबरला सकाळी पुण्यातून निघणार आहेत. त्याआधी २६ नोव्हेंबरला ते पुण्यात वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेला भेट देणार आहेत. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.२६ नोव्हेंबरला संविधान दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मुहूर्त या दिवशी साधण्यात आला आहे. हा पुतळा महापालिकेत उभारण्यासाठी ‘आरपीआय’ने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले या कार्यक्रमला उपस्थित राहणार आहेत.त्याचवेळी महापालिकेच्या हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन शाह यांच्या हस्ते होणार आहे.

महापालिकेतील कार्यक्रमानंतर शहर भाजपाच्यावतीने गणेश कला क्रिडा केंद्रात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमानंतर दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कात्रज येथील शिवसृष्टीला भेट देणार आहेत. तेथे शाह यांच्या उपस्थितीत दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या शोकसभेला उपस्थित राहणार आहेत. शाह यांचा रात्रीचा मुक्काम पुण्यात असून दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबरला सकाळी ते शिर्डी येथे देवदर्शन करून प्रवरानगरला जाणार आहेत.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.