विखे पाटील-तांबेंची लढत? : भाजपकडून व्यूहरचना

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आमदार डॉ. सुधीर तांबे ( Dr. Sudhir Tambe ) यांच्याविरोधात भाजपकडून राजेंद्र विखे पाटील यांना उतरविण्याची तयारी सुरू आहे.
Congress and BJP
Congress and BJP File Photo

अशोक निंबाळकर

Vikhe Patil : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आमदार डॉ. सुधीर तांबे ( Dr. Sudhir Tambe ) यांच्याविरोधात भाजपकडून राजेंद्र विखे पाटील यांना उतरविण्याची तयारी सुरू आहे. तसे झाल्यास या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. आजी-माजी महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय होऊ शकतो.

नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार असे या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आहे. टीडीएफने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जनसंपर्काचाही त्यांना आतापर्यंत फायदा झाला. त्यांनी स्वतः शिक्षकांसोबत इतर पदवीधरांची कामे करून वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीत त्यांना विखे पाटील यांचे तगडे आव्हान मिळू शकते. हा मतदारसंघ पूर्वी भाजपच्या ताब्यात होता. मात्र, डॉ. तांबे यांनी काँग्रेसकडे खेचून आणला.

Congress and BJP
काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांना ‘टीडीएफ’ने पुरस्कृत केले

आता त्यांना नगर जिल्ह्यातूनच आव्हान देण्याची भाजपची व्यूहरचना आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कामाचाही आणि वलयाचा भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपमध्ये दुसरा तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे विखे यांचेच नाव फायनल होऊ शकते. विखे पाटील कुटुंबाचे संस्थात्मक जाळे मोठे आहे. तोही त्यांचा प्लस पॉइंट आहे.

नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्यांचेच मतदारसंघावर वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत नाशिकची १ लाख १० हजार, तर नगरची मतदारसंख्या ९० हजार होती. विखे निवडणुकीत उतरल्यास नगर जिल्ह्यातील मते विभागली जाऊ शकतात, तर तिकडे नाशिकमध्ये शिवसेनेकडून शिक्षक आमदार दराडे यांचे चिरंजीव उतरण्याची तयारी करीत आहेत. पाचही जिल्ह्यांत विखे पाटील यांच्या यंत्रणेकडून नावनोंदणी सुरू आहे.

Congress and BJP
दुर्गा तांबे म्हणाल्या, आम्हाला निवडणुकांत रणधुमाळी करावी लागत नाही...

दोन्ही डॉक्टरांचा सामना

राजेंद्र विखे पाटील हे महसूलमंत्र्यांचे धाकटे बंधू आहेत. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात काम आहे. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. डॉ. तांबे यांची ही तिसरी टर्म आहे. दोनदा त्यांनी याच मतदारसंघातून आमदारपद भूषविले आहे. ते माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. संगमनेर नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष दुर्गा तांबे यांचे ते पती आहेत.

Congress and BJP
सुजय विखे म्हणाले आम्ही शिवसेनेसोबतच...पण...

टीडीएफचे तिरपांगडे

नाशिक पदवीधर मतदारसंघात टीडीएफची मोठी ताकद आहे. हिरालाल पगडाल यांची आतापर्यंत संघटनेवर कमांड होती. परंतु त्यांच्या कार्यपद्धतीवर तालुका कार्यकारिणी नाराज असल्याचे समजते. या संघटनेवर विखे पाटील यांची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. ऐन मतदानावेळी टीडीएफचे तिरपांगडे होऊ शकते, असा कयास व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in