विखे-पाटलांनी चौकशीचे आदेश देताच पाणी पुरवठा विभागाचे कार्यकरी अभियंता कोळी गेले रजेवर!

जलजीवन मिशनच्या कामांच्या निविदा मॅनेज करुन ठराविक ठेकेदारांनाच दिल्या असल्याचा आरोप कोळी यांच्यावर झाला आहे. या आरोपाची दोन समित्या आता कोळींची चौकशी करणार आहेत
Solapur ZP -Radhakrishana Vikhe Patil
Solapur ZP -Radhakrishana Vikhe PatilSarkarnama

सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishana Vikhe Patil) यांच्या आदेशानंतर सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी रजेवर गेले आहेत. जलजीवन मिशनच्या कामांच्या निविदा मॅनेज करुन ठराविक ठेकेदारांनाच दिल्या असल्याचा आरोप कार्यकारी अभियंता कोळी यांच्यावर झाला आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री विखे-पाटील यांच्या आदेशाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Radhakrishana Vikhe Patil ordered to inquiry, working engineer of water supply department koli went on leave)

जिल्हा नियोजन समितीच्या 4 ऑक्‍टोबरला झालेल्या बैठकीत माजी मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी हा विषय उपस्थित केला होता. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मोहोळचे आमदार यशवंत माने, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही या आरोपांमध्ये आपल्याकडील माहितीची भर या बैठकीत घातली होती. आमदारांचा रोख पाहून पालकमंत्री विखे-पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा येथील अभियंते व लेखाधिकारी अशा चार जणांची समिती नेमली आहे.

Solapur ZP -Radhakrishana Vikhe Patil
‘राणे ९० च्या दशकात काय करत होते...कुणाच्या हत्येच्या सुपाऱ्या दिल्या, हे सर्वांना माहिती आहे’

या समितीने चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. साधारणता १९ ऑक्‍टोबरपर्यंत समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. बैठकीत आरोप झाल्यानंतर कार्यकारी अभियंता कोळी यांनी दोन दिवसांची रजा टाकली आहे. पाच तारखेला सार्वजनिक सुटी असल्याने त्यांनी ६ व ७ ऑक्‍टोबरला रजा टाकली आहे. येत्या ८ व ९ तारखेला शासकीय सुटी असल्याने १० ऑक्‍टोबरपासून कार्यकारी अभियंता कोळी किमान दोन आठवड्यांसाठी पुन्हा रजेवर जाण्याची शक्‍यता आहे.

Solapur ZP -Radhakrishana Vikhe Patil
'आमदार होताच दुसऱ्याच दिवशी भाजपला पाठिंबा दिला : इचलकरंजीचा पहिला महापौरही भाजपचाच होईल'

चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष

जिल्हा नियोज समितीच्या बैठकीच्या आगोदरपासूनच जलजीवन मिशनच्या कामांचा विषय चर्चेत आला होता. जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या एकच दिवस आगोदर म्हणजे सोमवारी (ता. ३ ऑक्टोबर) मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य वित्त व लेखाधिकारी अजयसिंह पवार यांचा समावेश आहे. सीईओ स्वामी यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा आणि पालकमंत्री विखे-पाटील यांच्या आदेशानुसार नेमलेल्या चौकशी समितीचा काय अहवाल येतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com