पारनेरच्या नगराध्यक्षपदासाठी विजय औटींचे नाव आघाडीवर

पारनेर नगर पंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांनी प्रतिष्ठेची केली होती.
Parner Nagar Panchayat
Parner Nagar PanchayatSarkarnama

पारनेर ( जि. अहमदनगर ) - पारनेर नगर पंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी नीलेश लंके यांनी बहुमताचा आकडा जुळविला आहे. त्यामुळे पारनेर नगर पंचायतवर राष्ट्रवादीचीच सत्ता राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय सदाशिव औटी यांचे नाव चर्चेत आहे. Vijay Auti's name in the lead for Parner's mayoral post

पारनेर नगरपंचायतीचा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. निकालात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने प्रथम नगरपंचायतीत त्रिशंकू अवस्था झाली होती. मात्र, निकालनंतर राजकीय खेळी करीत आमदार नीलेश लंके यांनी आपल्या शहरविकास आघाडीचे दोन व एक अपक्ष अशा तीन नगरसेवकांना जुळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपंचायतीत नगरसेवकांची संख्या 10 करीत बहुमत मिळविले आहे. आता नगराध्यक्ष कोण होणार या कडे शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Parner Nagar Panchayat
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

राष्ट्रवादी काँग्रेसला सात, शिवसेनेला सहा, शहरविकास अघाडीस दोन व एक अपक्ष आणि एक भारतीय जनता पक्ष असे नगरपंचायतीत त्रिशंकू बलाबल तयार झाले होते. मात्र, निकालनंतर लगेचच आमदार लंके यांनी राजकीय खेळी करीत शहरविकास अघाडीचे दोन व एक अपक्ष अशा तीन नगर सेवकांना राषट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 10 झाली.

राज्यातील 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीचे आरक्षण 27 जानेवारीस मुंबई येथे काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता पारनेरचा नगराध्यक्ष कोण होणार या चर्चेला उधाण आले आहे. राषट्रवादीने नुकतीच जिल्हाधिकारी कार्यलयात नऊ सदस्यांची गटनोंदणीही केली आहे. मात्र, आरक्षण काय निघणार त्यावरच नगराध्यक्ष कोण होणार हे ठरणार आहे.

Parner Nagar Panchayat
लोकसभा नकोच; तुम्ही राज्याचे आर. आर. आबा व्हा : नंदकुमार झावरेंचा नीलेश लंके यांना कानमंत्र

नऊ नगरसेवकांची गट नोंदणी करताना राष्ट्रवादीने गटनेते म्हणून विजय सदाशिव औटी यांची निवड केली. उपगट नेते म्हणून सुरेखा भालेकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे जर पुरूष आरक्षण निघाले तर औटी यांना व महिला आरक्षण निघाले तर भालेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. काहीही आरक्षण निघाले तरी या दोघांपैकीच एक अध्यक्ष व एक उपाध्यक्षही निवडला जाईल.

आता आरक्षण 27 जानेवारीस असल्याने सर्वांच्यानजरा आरक्षणाकडे लागल्या आहेत. या शिवाय नगराध्यक्ष पदासाठी इतर इच्छुकांनी आमदार लंके यांच्याकडे आपले नांव कसे पुढे येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात प्रामुख्याने औटी व भालेकर यांच्या बरोबरच डॉ. विद्या कावरे, नितीन अडसूळ यांची नावेही चर्चेत आहेत. तरी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी विजय औटी यांचेच नाव आघाडीवर आहे. तसे झाले तर भालेकर, नितीन अडसूळ किंवा विद्या कावरे यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळू शकते.

Parner Nagar Panchayat
आता लाडके झालेल्या नीलेश लंकेना राष्ट्रवादीत घ्यायला विरोध होता

राज्यात महाविकास आघाडी आहे. तरीसुद्धा पारनेरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढली आहे. शिवसेनेला बाजूला ठेवले आहे. माजी आमदार विजय औटी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमदार लंके यांचा हेतू होता, तो त्यांनी सफल केला आहे. मात्र, नगराध्यक्ष कोणाला करावयाचे हे सर्वस्वी आमदार लंकेच ठरविणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com