विजय औटीच होणार पारनेरचे नगराध्यक्ष

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरमध्ये सत्ता समीकरणे जुळवली आहेत.
Vijay Auti- Parner Mayor News
Vijay Auti- Parner Mayor News Sarkarnama

पारनेर ( जि. अहमदनगर ) - पारनेर नगर पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. असे असले तरी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता समीकरणे जुळवली आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय औटींचे नाव जोरदार चर्चेत आले. ( Vijay Auti will be the mayor of Parner )

पारनेर नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी आज (ता. 9) अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विजय सदाशिव औटी, तर शिवसेनेतर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले आहेत. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने औटींची निवड जवळपास निश्चित आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा भालेकर तसेच नितीन अडसूळ यांची नावे आघाडीवर आहेत. (Parner Mayor News)

Vijay Auti- Parner Mayor News
लोकसभा नकोच; तुम्ही राज्याचे आर. आर. आबा व्हा : नंदकुमार झावरेंचा नीलेश लंके यांना कानमंत्र

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठीची निवडणूक 16 फेब्रुवारीस होत आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नऊ सदस्य असलेल्या गटाची नोंद यापूर्वीच केली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष त्यांच्याच पक्षाचा होणार, हे निश्चित आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 20 डिसेंबर व 19 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्यानंतर 20 जानेवारीला मतमोजणी झाली. आज नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यास सकाळी 10 ते सायंकाळी दोन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. अर्जमाघारीनंतरची अंतिम यादी 14 फेब्रुवारीला लावण्यात येणार असून, 16 फेब्रुवारीला निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदासाठीची निवड होणार आहे.

Vijay Auti- Parner Mayor News
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास निवडणूक घेऊन हात उंचावून मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच त्याच ठिकाणी उपनगराध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. नगरपंचायतीचा निकाल लागला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, शिवसेनेचे सहा, तर शहरविकास आघाडीचे दोन, भारतीय जनता पक्षाचा एक व अपक्ष एक, असे बलाबल तयार झाले होते. मात्र, त्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी शहरविकास आघाडीचे दोन व एक अपक्ष यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 सदस्य झाले आहेत. त्यांनी आपल्या नऊ सदस्यांची गटनोंदणीही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com