'मोठ्या नेत्यांशी जवळीक साधून...'; विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांना डिवचलं

Vidya chavan|Chitra Wagh| महाराष्ट्रात भाजपला पुढच्या ५० वर्षांमध्ये सत्ता मिळणार नाही.
Vidya chavan|Chitra Wagh|
Vidya chavan|Chitra Wagh|

कोल्हापूर : "सरशी तशी पारशी असं म्हटलं जातं, तसं चित्रा वाघ यांची अवस्था झाली आहे. त्यांना काहीतरी पाहिजे त्यामुळे त्यांना मोठ्या नेत्यांशी जवळीक साधून मोठे व्हायचे, ही त्यांची पद्धत आहे. पण मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. आम्ही तळागाळात काम मोठे झालो,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी भाजपा (BJP) नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

विद्या चव्हाण यांनी कोल्हापुरात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलं. "महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षामंध्ये कोणताही विसंवाद नाही. पण काहीजण महाविकास आघाडीमध्ये काहीतरी धुसफूस असल्याच्या अफवा पसरवत आहेत. पण महाराष्ट्रात भाजपला पुढच्या ५० वर्षांमध्ये सत्ता मिळणार नाही. त्यामुळे राणे साहेबांच्या दोन मुलांना आणि गोपीचंद पडळकरांना फ्कत राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपने पक्षात घेतल असल्याची जळजळीत टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.

Vidya chavan|Chitra Wagh|
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे देश सशक्त बनला!

भाजप सरकार महागाई आणि बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असते. पण या केंद्र सरकार आणि महागाईविरोधात राष्ट्रवादीकडून लवकरच मोर्चा काढणार आहे. महाभारतातील अर्जुनचे लक्ष्य जसे माशाचा डोळा होते, तसे आमचे लक्ष्य आता महागाई कमी हे असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसचे व पेट्रोलचे दर कमी करण्याच आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात मात्र गॅसचे दर एक हजार रुपयांच्या वर आणि पेट्रोलने शंभरी पार केली आहे. गॅस संपला की रॉकेलही नसते. पण आमच्या सरकारच्या काळात रेशन दुकानात रॉकेल मिळत होते. पण आता तेही मिळणे बंद झाले आहे. यामुळेअचानक गॅस संपला तर घर चालवायचे कसे हा मोठा प्रश्न महिलांना भेडसावत असतो, असेही विद्या चव्हाण यांनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com