शेतकरी एकजुटीचा, अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय
अजित पवारसरकारनामा

शेतकरी एकजुटीचा, अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय

अखेर केंद्रातील भाजप ( BJP ) सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.

पुणे : केंद्र सरकारच्या नवीन कृषी विषयक कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनही उभे केले होते. अखेर केंद्रातील भाजप सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. Victory of peasant unity, non-violence, path of satyagraha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन तीन कृषी कायदांचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

अजित पवार
अजित पवार म्हणाले, सरकार नोटा छापायची मशिन नाही...

अजित पवार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे," असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार
अजित दादा म्हणाले, मी सकाळी ८.३० वाजताच मंत्रालयात येतो...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात मंत्री नवाब मलिक, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, सीपीएमचे डॉ. अजित नवले आदींचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in