वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट : गव्हर्निंग कौन्सिलवर बाळसाहेब पाटील यांची निवड

जेष्ठ नेते खासदार MP शरद पवार Sharad Pawar यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे Vasant Dada Sugar institute कामकाज सुरू आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट : गव्हर्निंग कौन्सिलवर बाळसाहेब पाटील यांची निवड
Balasaheb Patilsarkarnama

कऱ्हाड : सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कारखान्याचे संचालक सुरेशराव माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कामकाज सुरू आहे. राज्यातील साखर उद्योगाला या संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी व सहकारी साखर कारखाने यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून नवीन ऊसांच्या जाती तयार करण्यासंबंधी संशोधन केले जाते.

Balasaheb Patil
सातारा-जावळीत 'राष्ट्रवादी'चाच आमदार झाला पाहिजे....जयंत पाटील

हेक्टरी उत्पादन वाढविणे, ऊस शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करणे, पाणी व खतांचा योग्य वापर, उस तोडणी कार्यक्रम आदि बाबत शेतकरी व साखर कारखान्यांना मार्गदर्शन केले जाते. त्या संस्थेवर यापूर्वी मंत्री पाटील यांची 2002 आणि 2007 साली सलग दोन वेळा गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली होती. त्यांची आता तिसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे.

Balasaheb Patil
Video: सत्ता येते, सत्ता जाते मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही; शरद पवार

त्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, संचालक मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील, दत्तात्रय जाधव, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, संजय थोरात, अविनाश माने, रामचंद्र पाटील, बजरंग पवार, पांडुरंग चव्हाण, सर्जेराव खंडाईत, लहूराज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, संचालिका शारदा पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.