'वाजपेयी, आडवाणींचा पराभव झाला असेल; पण मोदी कधीच पराभूत होणार नाहीत'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेचा आत्मा; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा अचिंबित करणारा दावा
Suresh Khade
Suresh KhadeSarkarnama

पंढरपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) , माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (LK Advani) यांचा पराभव झाला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा कधीच पराभव होऊ शकत नाही. कारण, ते देशातील जनतेचा आत्मा आहेत, असा अचिंबित करणारा दावा राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी आज (ता. १० सप्टेंबर) पंढरपूर येथे केला. त्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे. (Vajpayee, Advani would have been defeated; But Modi will never be defeated : Suresh Khade)

कामगार मंत्री सुरेश खाडे हे शनिवारी (ता. १० सप्टेंबर) विठ्ठल-रूक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर मंत्री खाडे यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी‌ संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत मोदींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Suresh Khade
कॅप्टन अमरिंदर सिंग आपला पक्ष भाजपत विलिन करणार? : अमित शहांबरोबर दिल्लीत बैठक

बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूर्य पश्चिमेला ज्या दिवशी उगवेल, त्या दिवशी बारामतीमध्ये पवारांचा पराभव होईल, असा टोला भाजपला लगावला होता. तोच धागा पकडून कामगार मंत्री खाडे यांना विचारले असता, त्यांनीही जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला.

Suresh Khade
सोलापूर विद्यापीठात शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची लिट्‌मस टेस्ट; युवा सेनेबरोबर एकत्र लढणार

या वेळी मंत्री खाडे म्हणाले की, देशात लोकशाही आहे. शेवटी जनतेच्या मनात आल्यावर काही होऊ शकते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मोठ्या नेत्यांचा पराभव झाला होता. त्यावर पत्रकारांनी मोदींच्या बाबत असे काही घडेल का असे विचारताच, क्षणभर बुचकुळ्यात पडलेल्या मंत्री खाडे यांनी लगेच मोदी यांच्या बाबतीत असे काही होणार नाही. कारण, ते जनतेचा आणि देशाचा आत्मा आहेत. त्यामुळे त्यांचा कधीच पराभव होणार नाही, असे आर्श्चकारक विधान केले. त्यांच्या या विधाननंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्याच्या नादात आपले हसू करुन घेतल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

Suresh Khade
Sunil Raut : दिल्लीत राजकीय भेटीसाठी आलो नाही ; राऊतांचा दावा

या वेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर,भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट, प्रणव परिचारक, लक्ष्मण धनवडे, माऊली हळणवर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन आणि रुग्णालय उभारणार

राज्यात असंघटीत कामगारांची संख्या मोठी आहे. अशा कामगारांची नव्याने नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या तीन महिन्यांत नोंदणीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर अशा कामगारांना सरकारच्या माध्यमातून कायमस्वरुपी काय मदत करता येईल, या विषयी चर्चा केली जाईल. येत्या काही दिवसांत प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन आणि रुग्णालयाची उभारणी करण्याचा विचार सुरु आहे. त्या संदर्भात लवकरच एक प्रस्ताव तयार करुन तो मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये ठेवला जाईल, असेही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com