वैभव पिचड म्हणाले, आमदार करणाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांविषयी मी काय बोलू...

अकोले नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपचे ( BJP ) नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी काल ( शनिवारी ) भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली.
वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
वैभव पिचड, डॉ. किरण लहामटेसरकारनामा

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अकोले नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपचे ( BJP ) नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी काल ( शनिवारी ) भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. या प्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांच्यावर टीका केली. Vaibhav Pichad said, what can I say about those who insult those who make MLAs ...

या प्रचार सभेला शिवाजी धुमाळ, सोनाली नाईकवाडी, हितेश कुंभार, कल्पना सुरपुरिया, शंभू नेहे, राहुल देशमुख, गोकुळ वाघ आदींसह मोठ्या संख्येने महिला व युवक उपस्थित होते.

वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

वैभव पिचड म्हणाले, नगरपंचायतमध्ये उभे असलेले आमचे उमेदवार पदवीधर निष्कलंक चारित्र्य संपन्न आहेत. त्यांनी कोणताही रेशन घोटाळा अथवा खंडणी मागितली नाही. तर नगरपंचायतला 14 कोटीचा निधी दिल्याच्या गाजर गप्पा सांगणाऱ्या व खोटे बोल पण रेटून बोल अशा बोल घेवड्यांना या निवडणुकीत सुज्ञ जनता जागा दाखवून देतील, असे वैभव पिचड यांनी सांगितले.

वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे
वैभव पिचड म्हणाले, आम्ही चाळीस वर्षे विकासच केला...

शिवाजी धुमाळ म्हणाले, अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी रेशन घोटाळ्याबाबत उशिरा राजीनामा देण्याची भाषा करतात. प्रशासनाला वेठीस धरतात. त्यांना आता त्यांच्याच पक्षाचे लोक प्रश्न विचारून चौकशीची मागणी करतात. ज्यांनी आमदारकीसाठी साथ दिली त्यांचा अवमान करणाऱ्यांविषयी अधिक काय बोलायचे. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत मधुकर तळपाडे, अशोक भांगरे, मारुती मेंगाळ, बाजीराव दराडे कुठे आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com