वैभव पिचड म्हणाले, कामापेक्षा वैयक्तिक टीका टिपण्णी हाच त्यांचा अजेंडा...

वैभव पिचड म्हणाले, कामापेक्षा वैयक्तिक टीका टिपण्णी हाच त्यांचा अजेंडा...
Vaibhav Pichad Vs Dr. Kiran LahamteSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील आदिवासी भागात हिरडा गोळा करण्याचे काम सुरू आहे. खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात माल द्यावा लागतो. त्यात काटे मारण्याचे प्रकार सुरू असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. याबाबत आदिवासी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने आज भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री व माजी आमदार वैभव पिचड यांची भेट घेतली. या प्रसंगी वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना नाव न घेता आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) व महाविकास आघाडीवर टीका केली. ( Vaibhav Pichad said that his agenda is personal criticism rather than work )

हिरडा खरेदी केंद्र सुरू नसल्याने हिरडा जंगली वनोपज खनिजे पडून आहेत. तसेच खावटी योजना बंद पडली आहे. ठराविक लोकांनाच ती दिली जाते. आदिवासी विकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना थांबल्या आहेत. शबरी महामंडळ मर्यादित योजनांचा बोजवारा उडाला आहे. आदिवासींना स्वतंत्र आर्थिक बजेट असताना कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. तरी देखील आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला. भात खरेदी अनुदान अद्याप मिळाले नाही. याबाबत तक्रारी ऐकून घेत माजी आमदार वैभव पिचड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Vaibhav Pichad Vs Dr. Kiran Lahamte
वैभव पिचड म्हणाले, आमदार करणाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांविषयी मी काय बोलू...

वैभव पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात हिरडा खरेदी केंद्र सुरू नाही, खावटी वाटप नाही, ठक्कर बाप्पा योजना बंद, वैयक्तिक लाभाच्या योजना, शबरी महामंडळ योजना बंद, भात खरेदी याबाबत राज्यसरकार व तालुक्याचे लोकप्रतिनिधी गप्प आहेत. सामाजिक कामाचा टेंभा मिरविणारे याकडे लक्ष्य देत नसून केवळ वैयक्तिक टीका टिप्पणी करणे हाच त्यांचा विकासाचा अजेंडा असल्याची टीका वैभव पिचड यांनी केली

अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी करतात काय? मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार तुमचे आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्यांनी आदिवासी समाज विकास योजनांपासून दूर जात असताना जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. तर त्यांचे हितचिंतक सामाजिक बेगडी झालर लावून केवळ वैयक्तिक टीका टिप्पणी करतात त्यांना हे प्रश्न समजत नाहीत का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Vaibhav Pichad Vs Dr. Kiran Lahamte
वैभव पिचड म्हणाले, आम्ही चाळीस वर्षे विकासच केला...

हिरडा खरेदी केंद्र तातडीनं सुरू करून सरकारने हिरडा व जंगली माल खरेदी करावा अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला.

यावेळी सुरेश भांगरे, सयाजी अस्वले, विजय भांगरे, गंगाराम धिंदले, भरत घाणे, सुरेश गभाले, पांडुरंग भांगरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in