वैभव पिचड म्हणाले, निवडणुकीत दिलेले शब्द पाळा...

भाजपचे ( BJP ) नेते वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर ( Mahavikas Aghadi ) जोरदार टीका केली.
vaibhav pichad
vaibhav pichadSarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. यात अकोले नगरपंचायतचाही समावेश असल्याने अकोले तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच मागील दोन दिवसांपासून पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमालचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काल ( शुक्रवारी ) भाजपचे ( BJP ) नेते वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर ( Mahavikas Aghadi ) जोरदार टीका केली. Vaibhav Pichad said, follow the words given in the election...

vaibhav pichad
`रोहयो`च्या कामाबाबत लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष : वैभव पिचड यांचा टोला

अकोले तालुक्यात मागील दोन दिवसांत जो पाऊस पडला व या ठिकाणी वातावरणात जो बदल झाला, त्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, आमदार साहेब निवडणुकीत पायाला भिंगरी लावून जनतेची, शेतकऱ्यांची मते घेतली. निवडणुकीत दिलेले शब्द पाळा. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी झोपलेल्या सरकारला जागे करून नुकसानग्रस्तांच्या पिकांचे पंचनामे करा, असे वैभव पिचड यांनी सांगितले.

vaibhav pichad
शरद पवार, मधुकर पिचड, गावित असे नेते चौदा किलोमीटर चालत त्या गावात पोहोचले होते..

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी जेव्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, तेव्हा कुठलेही पंचनामे झाले नाहीत, म्हणून आज अकोले तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याठिकाणी शेतकरी बांधवांना शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही आणि त्यात अवकाळी पावसात भातपिकाचे, कांद्याचे तसेच इतर पिकांचे अतिशय मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर व्हावेत ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in