वैभव पिचडांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिल्या मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा

माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी मुंबईत जाऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वैभव पिचडांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिल्या मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा
Vaibhav PichadSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेचे सुमारे 40 आमदार भाजपच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची चिन्हे आहेत. अशातच भाजपचे नेते, माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी मुंबईत जाऊन माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. ( Vaibhav Pichad met Devendra Fadnavis and wished him the best of luck as the Chief Minister )

राजकीय घडामोडींना वेग आला असताना भाजपचे सर्व आजी माजी आमदार हे सागर बंगल्याच्या संपर्कात आले आहेत. आज सकाळी अकोल्याचे माजी आमदार व भाजप अनुसूचीत जमाती मोर्चाचे वैभव पिचड ठराविक कार्यकर्त्यांना सोबत घेत मुंबईला रवाना झाले. त्यांनी मुंबईत सकाळी दहा वाजता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री पदाबद्दल अभिनंदन केले. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली.

Vaibhav Pichad
वैभव पिचड म्हणाले, कामापेक्षा वैयक्तिक टीका टिपण्णी हाच त्यांचा अजेंडा...

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच झाला. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस येऊ शकले नव्हते. या संदर्भात वैभव पिचड हे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चांगली कामगिरी पार पाडली व सर्व जागेंवर विजयी मिळविला. तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा. तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा. मधुकरराव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यात अभिष्टचिंतन सोहळ्यात आले नव्हते मात्र तुम्ही व्हिडिओ द्वारे दिलेल्या शुभेच्छा मिळाल्या, असे म्हणत आभार व्यक्त केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मधुकरराव पिचड यांच्या वाढदिवसाला येता आले नाही मात्र लवकरच अकोले येथे येऊन भेटेल असे सांगितले.

Vaibhav Pichad
वैभव पिचड म्हणाले, आम्ही चाळीस वर्षे विकासच केला...

वैभव पिचड यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे वडील मधुकरराव पिचड हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात 15 वर्षे राज्याचे विविध विभागांचे मंत्री होते. वैभव पिचड हे राज्य आदिवासी परिषदेचे अध्यक्ष तर मधुकरराव पिचड हे अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in