केंद्राकडून लस उपलब्ध होताच, मुलांचे लसीकरण : अजित पवार

शाळा सुरू झाल्या असल्यातरी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची अद्यापर्यंत तरी मानसिकता झालेली नाही. पण, पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
केंद्राकडून लस उपलब्ध होताच, मुलांचे लसीकरण : अजित पवार
Ajit Pawarsarkarnama

सातारा : शाळा सुरू झाल्या असल्यातरी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची अद्यापर्यंत तरी मानसिकता झालेली नाही. तरीही पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन करून मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे. मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. त्यासाठी नवीन लस उपलब्ध होणे गरजेची आहे. ती लस आरोग्याला योग्य, अयोग्य आहे, याचे संशोधन होईल मगच निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सातारा शासकिय विश्रामगृहात श्री. पवार यांच्या पत्रकारांनी संवाद साधला. कोरोनानंतर प्रथमच शाळा सुरू झाल्या आहेत, पण मुलांच्या लसीकरणाचे काय असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असा ते म्हणाले, मुलांना लसीकरण करण्याबाबत देश पातळीवरून अद्याप आदेश आलेले नाहीत. १२ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण करावे, याबाबत चर्चा आहे, पण निर्णय झालेला नाही.

Ajit Pawar
रामराजे, बाळासाहेब पाटील भाजपच्या नेत्यांना चुचकारणार...

त्यासाठी नवीन लस उपलब्ध होणे गरजेची आहे. ती लस आरोग्याला योग्य, अयोग्य आहे, याचे संशोधन होईल मगच निर्णय होईल. पहिल्यांदा ४५ वरील वयोगटातील लसीकरण झाले. नंतर १८ वर्षावरील लोकांचे लसीकरण सुरू केले. केंद्राचे आदेश आल्यानंतरच १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण होईल.

Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, आता माझ्याच ज्ञानात नवीन भर पडायला लागली..

शाळा सुरू झाल्या असल्यातरी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची अद्यापर्यंत तरी मानसिकता झालेली नाही. पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन करून श्री. पवार म्हणाले, दिवाळी संपल्यानंतर मुलांना शाळेत पाठवावे, तोपर्यंत कोरोना संसर्गाचा अंदाज येईल, असा विचार करणारा एक वर्ग आहे. शेवटी शाळा सुरू केल्या तरी मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे, असेही त्यांनी स्‍पष्ट केले.

Related Stories

No stories found.