राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी गाठली गोविंद बाग!

पवारांनी सोलापूर दौऱ्यात यात लक्ष घालण्याचे सूतोवाच केले आहे.
Sharad Pawar-NCP Activist's
Sharad Pawar-NCP Activist'sSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी बदलावरून पेटलेला वाद ‘गोविंद बागे’पर्यंत जाऊन पोचला आहे. बदलामुळे नाराज झालेल्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोविंद बागेत जाऊन पवारांची भेट घेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यावर पवारांनी उद्या (ता. ८ आक्टोबर) सोलापूर दौऱ्यात यात लक्ष घालण्याचे सूतोवाच केले आहे, त्यामुळे सोलापूर दौऱ्यात पवार या वादावर कसा पडदा टाकतात, याकडे मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Upset NCP office bearers from Mangalveda met Sharad Pawar at Govind Bagh)

बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील प्रस्तावित गावे आणि पाणी मागील भाजप सरकारने कमी केले होते. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच आमदार (स्व.) भारत भालके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेत पाणी व गावे पूर्ववत केले. त्याबाबत सर्वेक्षण करून जलसंपदा विभागाने बुधवारी (ता. ६ आक्टोबर) शासकीय अध्यादेश जाहीर केला. त्याबदल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने बारामतीत गोविंद बागेत त्यांची भेट घेतली.या शिष्टमंडळात पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक बशीर बागवान, चंकी खवतोडे, नितीन नकाते, सुरेश पवार, सुनील डोके, भारत बेदरे, मुजम्मिल काझी, सोमनाथ बुरजे आदींचा समावेश होता.

Sharad Pawar-NCP Activist's
पुण्यात आलोय अन्‌ ‘जमां’ची भेट झाली नाही, असं कधी होत नव्हतं : पवारांनी जागविल्या सहकाऱ्याच्या आठवणी

या वेळी पाणी संघर्ष समितीचे पांडुरंग चौगुले यांनी संबंधित गावातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून या योजनेस फेरमंजुरी, आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे नेते भारत बेदरे यांनी या योजनेचे उद्‌गाते (स्व.) भारतनाना भालके यांचे नाव या योजनेस देण्यासंबंधी 5 सप्टेंबर रोजी मंगळवेढा येथील आढावा बैठकीत करण्यात आलेल्या ठरावाची माहितीही पवार यांना देण्यात आली.

Sharad Pawar-NCP Activist's
काँग्रेसच्या दहा उमेदवारांवर डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की

मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये कार्यरत पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने फेरबदल करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. पक्ष संघटनेमध्ये काही मंडळींनी मालकशाही चालवली असून त्यामुळे त्यामुळे पक्षांतर्गत कलह व गटबाजी वाढीस लागल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत याचे परिणाम भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात आपण लक्ष घालावे, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. जिल्ह्यातील काहींनी पक्षात लुडबुड केल्याची गोष्ट आपल्या कानावर यापूर्वीच आल्याचे सांगत जबाबदार नेत्यांकडून अशा गोष्टी अपेक्षित नाहीत, असे सांगत यावर उद्याच्या दौऱ्यात लक्ष घातले जाईल, असे पवार यांनी सांगितल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com