खासदार मंडलिकांच्या आमदार मेव्हण्यांसाठी महाडिक-पीएन पाटलांचे डावपेच!

बँकेतील बिनविरोध निवडीने आमदार पाटील Rajesh Patil गटाला पुन्हा बळ मिळाले आहे.
Kolhapur District Bank
Kolhapur District Banksarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणुकीत (Kolhapur District Bank Election) पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पाठोपाठ आज (ता. २१) चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पाटील यांनी चंदगड तालुका विकास संस्था गटातून अर्ज दाखल केला होता. या गटातून मोहन संतू परब यांनी अर्ज दाखल केला होता. आज परब यांनी माघार घेतल्याने आमदार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यात आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री भरमू पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक (Mahadevrao Mahadik) यांनी शिष्टाई करत पाटील यांना बिनविरोध केले.

Kolhapur District Bank
कट्टर विरोधक असलेल्या घाटगे आणि मुश्रीफ गटाचे असेही मनोमीलन

पाटील यांचे वडील व माजी आमदार कै. नगरसिंगराव पाटील हे या गटातून बँकेत संचालक होते. कै. पाटील यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आमदार पाटील यांना स्विकृत्त संचालक म्हणून घेण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांच्यासह परशुराम पाटील, मोहन परब यांचे अर्ज छाननीनंतर शिल्लक राहीले होते. काही दिवसांपुर्वी पाटील यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे या गटातून आमदार पाटील व परब या दोघांमध्ये लढत होती.

आज परब यांच्या माघारीसाठीच्या घडामोडी सुरू झाल्या. आमदार पाटील यांनी माजी मंत्री भरमू पाटील यांची भेट घेऊन परब यांच्या माघारीसाठी विनंती केली. त्यानंतर महाडीक आणि पी. एन. पाटील यांनी माजी मंत्री पाटील यांना संपर्क साधला. त्यानंतर परब यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने बँकेवर चंदगड तालुका विकास संस्था गटातून आमदार पाटील यांची निवड बिनविरोध झाली.

Kolhapur District Bank
घाटगे आणि मुश्रीफ यांनी केली तडजोड : `शाहू` बिनविरोध, तर बॅंकेचाही तिढा सुटला...

'गोकुळ' मध्ये झाला होता पत्नीचा पराभव

आमदार पाटील हे दिवंगत खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे जावई तर खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे मेव्हणे आहेत. मे महिन्यात झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुस्मिती यांच्यासह प्रा. मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र यांचा पराभव झाला होता. आता बँकेतील बिनविरोध निवडीने आमदार पाटील गटाला पुन्हा बळ मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in