राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी लाभेष औटींची बिनविरोध निवड

राळेगणसिद्धीचे ( Ralegan Siddhi ) सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज निवड प्रक्रिया झाली.
राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी लाभेष औटींची बिनविरोध निवड
राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेष औटीसरकारनामा

राळेगणसिद्धी ( अहमदनगर ) : राळेगणसिद्धीचे सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज निवड प्रक्रिया झाली. निवडीसाठी मंडलाधिकारी आर. आर. कोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात आज ( शुक्रवारी ) सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाभेष औटी यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. Unopposed election of Labhesh Auti as Sarpanch of Ralegan Siddhi

राळेगणसिद्धीसह परिसराला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला. लाभेष औटी हे राळेगणसिद्धीचे दिवंगत सरपंच गणपतराव औटी यांचे ते चिरंजीव आहेत. गणपतराव औटी हे अण्णा हजारे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते.

राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेष औटी
आमदार लंके यांचे 25 लाखाचे पहिले बक्षिस राळेगणसिद्धी जिंकणार

यावेळी सरपंच पदासाठी लाभेष औटी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंडलाधिकारी आर.आर कोळी यांनी जाहीर केले. या निवडीसाठी तलाठी अशोक डोळस, ग्रामसेवक वैशाली भगत, भाऊसाहेब पोटघन आदींनी मदत केली.

यावेळी उपसरपंच अनिल मापारी, माजी सरपंच डॉ. धनंजय पोटे, जयसिंग मापारी, मंगल मापारी, ग्रामपंचायत सदस्य सुनीता गाजरे, स्नेहल फटांगडे, मंगल उगले, मंगल पठारे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण करत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली. यावेळी उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, रमेश औटी, विठ्ठल गाजरे, जयसिंग मापारी, किसन पठारे, शरद मापारी, पोपट औटी, बाळासाहेब पठारे, कांतीलाल औटी, संतोष औटी, भाऊसाहेब मापारी, एकनाथ मापारी, शरद पठारे, अक्षय पठारे, प्रविण पठारे, आकाश पठारे, अरूण पठारे, दादाभाऊ गाजरे, दादाभाऊ पठारे, किसन मापारी, गोरख मापारी आदी उपस्थित होते.

निर्वाचित सरपंच लाभेष औटी यापुढे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन ग्रामविकासाचे कार्य करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केला.

राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेष औटी
अण्णा हजारे म्हणाले, हा विजय विरोधकांचा नसून शेतकऱ्यांचा...

संपूर्ण राळेगणसिद्धी व परिसर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. लवकरच अण्णांच्या मार्गदर्शनाखाली 25 मेगावॅट प्रकल्प उभा करणार आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना विजेची कोणतीही समस्या जाणवणार नाही.

- लाभेष औटी, नवनिर्वाचित सरपंच, राळेगणसिद्धी

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in