घाटगे आणि मुश्रीफ यांनी केली तडजोड : `शाहू` बिनविरोध, तर बॅंकेचाही तिढा सुटला...

निवडीनंतर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा सत्कार करण्यात आला.
Hasan Mushrif

Hasan Mushrif

sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur District Bank Election) सोमवारी कागल विकास संस्था गटातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या गटातून बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पाठोपाठ मुश्रीफही बिनविरोध झाल्याने सत्तारूढ गटाला मोठा दिलासा मिळाला.

कागल तालुका विकास संस्था गटातून 'शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक बाबासो हिंदुराव पाटील यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पाटील यांनी घाटगे यांची भेट घेतली. घाटगे यांनी पाटील यांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली. त्यामुळे पाटील यांनी दुपारीच अर्ज मागे घेतला त्यामुळे मुश्रीफ बिनविरोध झाले. त्याच दरम्यान 'शाहू-कागल'ची निवडणुकही बिनविरोध झाली. जिल्हा बँकेत 'शाहू'साठी तडजोड झाली का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

<div class="paragraphs"><p>Hasan Mushrif</p></div>
दारूण पराभव होऊनही भाजपच्या बड्या नेत्यानं मानले निवडणूक आयोगाचे आभार

कागल तालुक्यातून मुश्रीफ यांचे स्वतःचे चार तर इतर पाच जणांचे असे नऊ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीचा उद्या (ता. २२) शेवटचा दिवस आहे. मात्र, आजच या गटातून प्रताप दत्तात्रय पाटील, युवराज अर्जुनराव पाटील, दत्तात्रय तुकाराम खराडे, बाबासो हिंदुराव पाटील व धनंजय सदाशिवराव पाटील यांनी माघार घेतली. सत्तारूढ आघाडीचे पॅनेल ठरवण्यासाठी मुश्रीफ दिवसभर विश्रामगृहार ठाण मांडून आहेत. मुश्रीफ बिनविरोध झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर जल्लोष केला.

निवडीनंतर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, मदन कारंडे उपस्थितीत होते. बँकेने गेल्या सहा वर्षांत घेतलेली गरूडभरारी कौतुकास्पद आहे. माझी बिनविरोध निवड ही शेतकरी सभासदांच्या विश्‍वासाचे फलित आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासाठी अहोरात्र कार्यरत राहू, असे मुश्रीफ म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Hasan Mushrif</p></div>
उदयनराजेंनी 'त्यावेळी' डबे घेवून नेत्यांचे उंबरठे कशाला झिझवले?

मुश्रीफ सातव्यांदा बँकेत

मुश्रीफ सलग सातव्यांदा जिल्हा बँकेवर निवडून गेले आहेत. ते १९८६ मध्ये कागल संस्था गटातील तत्कालीन संचालक हिंदुराव पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा संजय घाटगे यांचा पराभव करून बँकेत आले. त्यानंतर त्यांची ९० व २००५ मध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर या वेळी तिसऱ्यांदा मुश्रीफ बँकेत बिनविरोध विजयी झाले. १९९५ मध्ये कै. बबन पाटील, २०१४ मध्ये दत्तोपंत वालावकर हे या गटातून मुश्रीफ यांच्या विरोधात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com