मोदींचे भाषण सुरू असतानाच केंद्रीय मंत्री आठवलेंना लागली डुलकी!

व्हीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) येथील कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमलेनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) उपस्थित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे भाषण सुरू असताना आठवले यांना झोप अनावर झाली आणि भर कार्यक्रमात आठवले यांना डुलकी लागली. (Union Minister Ramdas Athavale sleep during the program at solapur)

कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमलेन आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. व्हीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. काही प्रश्नोत्तरांचा तास झाला. याच कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे भाषण सुरू असतानाच भर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झोप अनावर झाली. त्यांना काही काळासाठी डुलकी लागल्याचं चित्र दिसून आलं.

Ramdas Athavale
‘दामाजी’चे बिगूल वाजले : समाधान आवताडेंना महाविकास आघाडी देणार टक्कर!

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील केंद्र सरकारच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान काही काळासाठी वीजही गेली होती. मात्र, आयोजकांनी जनित्राची (जनरेटर) सोय करून कार्यक्रम तत्काळ पूर्ववत सुरु केला.

Ramdas Athavale
प्रतापगडींच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा; सोनिया गांधीवरही टीका

या कार्यक्रमानंतर आठवले यांनी मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आपल्या खास स्टाईलने शुभेच्छा दिल्या. तसेच, शेतकरी कायदे, राज्यसभा निवडणूक, संभाजीराजे छत्रपती यांना न मिळालेली यावर भाष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com