शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे; म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगोल्यात घेतली शिवसेना आमदार शहाजी पाटील यांची भेट
शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे; म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे!
Shahaji Patil-Ramdas AthavaleSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : ‘शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे; म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे' अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या कामांबाबत प्रशंसा करीत शिवसेना व आम्ही सोबत नसलो तरी बापू आणि आम्ही कायम एकत्रच राहू, असे आश्वासन देत राजकीय फटकेबाजी केली. (Union Minister Ramdas Athavale meet to shivsena MLA Shahaji Patil at Sangola)

 केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सोमवारी (ता.14 फेब्रुवारी) सांगोला दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. 'युरोपमध्ये रोम आहेत, म्हणूनच शहाजीबापूंचं माझ्यावर प्रेम आहे. शहाजीबापूंचे माझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच शिवसेनेत जाण्याचा त्यांचा गेम आहे.' अशी कविता सादर करत ते म्हणाले की, या वेळी विधानसभेत जाण्यासाठी बापूंला आम्ही मदत केली होती. विधानसभेत आल्यानंतर त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी व प्रामुख्याने पाणीप्रश्नासाठी भरीव असे काम केले आहे. (स्व.) गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे खूप मोठे नेते हेाते. शहाजीबापूही अत्यंत अभ्यासू व तालुक्यासाठी काम करणारे नेते आहेत. त्यांना सांगोलासारख्या मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना व आम्ही एकत्रित नसलो तरी शहाजीबापू आणि आम्ही मात्र कायम एकत्रितच राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Shahaji Patil-Ramdas Athavale
बिनविरोध नेत्यांच्या भूमिकेमुळे महाआघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली; भाजपने लावला जोर!

 या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्यचिटणीस राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, चंद्रकांत वाघमारे, रवी गायकवाड, विक्रम शेळके, दिगंबर गवळी, राजा मागाडे, तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, रफिक नदाफ, संजय देशमुख, सुभाष इंगोले, दामोदर साठे, रवी बनसोडे, संजय गाडे, आशिष गायकवाड इत्यादी नेतेमंडळी उपस्थित होते.

Shahaji Patil-Ramdas Athavale
मराठवाड्यातील बडा नेता महादेव जानकरांची साथ सोडणार!

व्हॅलेंटाईन डे आणि मंत्र्यांचे प्रेम

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची आज ('व्हॅलेंटाईन डे') भेट घेतली. या भेटीवेळी पक्षापेक्षा त्यांनी वैयक्तिक संबंध व त्यांच्यामध्ये असणारे प्रेमच जास्त व्यक्त केले. त्यामुळे आज प्रेमाच्या दिवशीच केंद्रीय मंत्र्यांचे तालुक्यातील विरोधी नेतेमंडळीवरील प्रेमच जास्त दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in