Jyotiraditya Shinde : भाजपने वाढवले खासदार मंडलिक अन् मानेंचे टेन्शन; शिंदे तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर

Sanjay Mandlik and Darishsheel Mane News : कोल्हापूर दौऱ्यात ज्योतिरादित्य शिंदे शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत
Sanjay Mandlik, Darishsheel Mane, Jyotiraditya Shinde
Sanjay Mandlik, Darishsheel Mane, Jyotiraditya ShindeSarkarnama

Jyotiraditya Shinde News : आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपकडून (BJP) जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून, भाजपकडून आखलेल्या लोकसभा प्रवास योजनेच्या दृष्टीकोनातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उद्यापासून (२३ मार्च ) दोन दिवसीय कोल्हापूर जिल्हा (Jyotiraditya Shinde) दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे शिंदेगटाचे (शिवसेना) खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशील माने (Darishsheel Mane) यांचे टेन्शन वाढले आहे.

कोल्हापूर दौऱ्यात ज्योतिरादित्य शिंदे शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत, तसेच सरकाच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा प्रवास या पक्षाच्या कार्यक्रमानुसार ते सलग तिसऱ्यांदा कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत. मागील दोन दौऱ्यात त्यांनी कोल्हापुरातील चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यामध्ये सरकारने राबविलेल्या विकासकामांचा आढावा घेतला होता.

Sanjay Mandlik, Darishsheel Mane, Jyotiraditya Shinde
Pimpri Chichwad News : मंत्र्यांच्या वेळेअभावी पिंपरी-चिंचवडककरांच्या तोंडचे पाणी पळाले!

कोल्हापुरातील जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे (Shivsena) खासदार आहेत. केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आणि त्यांनी लावलेला बैठकांच्या धडाक्यामुळे खासदारांची डोकेदुखी वाढली आहे. येथील दोन्ही खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपची युती असतानाही, शिवसेनेच्या मतदार संघात भाजपचे केंद्रीय मंत्री दौरे करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची रणनिती नेमकी काय आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भाजप या मतदारसंघात उमेदार देणार का? याचीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या तरी खासदारांचे टेन्शन वाढले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे उद्या गुरूवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते शिरोळकडे रवाना होतील. संध्याकाळी पाच वाजता ते हातकणंगलेच्या हुपरी या ठिकाणी चांदी कामगारांशी संवाद साधणार आहेत. यानंतर ते शिरोळ तालुक्यातील एका कार्यक्रमास उपस्थित राहतील.

Sanjay Mandlik, Darishsheel Mane, Jyotiraditya Shinde
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'राष्ट्रीय दर्जाला' धोका नाही; पक्षाने आयोगासमोर मांडली बाजू

कुरूंदवाडमधील आणखी एका कार्यक्रमास उपस्थिती लावून, रात्रीच्या सुमारास कोल्हापुरात त्यांचे आगमन होणार आहे. इथेच ते मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ते जोतिबा मंदीराला भेट देणार आहेत. जोतिबा दर्शनानंतर ते पन्हाळाकडे प्रस्थान करणार आहेत. तेथे एका कार्यक्रामत ते सहभागी होतील. यानंतर एका स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत, असा त्यांचा दोन दिवसीय दौरा असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com