Karad : महाराष्ट्रात दुर्दैवी राजकारण; 'ईडी'चे सरकार असंवेदनशील... सुप्रिया सुळे

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांच्या विचारांचे महाराष्ट्र Maharashtra राज्य आहे. आत्ता ज्या पध्दतीने राज्यात राजकारण Politics सुरु आहे, त्याची देशभर चर्चा होते.
NCP MP Supriya Sule
NCP MP Supriya Sulesarkarnama

कऱ्हाड : राज्यात सत्तेवर असलले 'ईडी'चे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. सरकारबद्दल रोज जे ऐकायला मिळतय ते चिंताजनक आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे राज्य आहे. आम्हाला सत्ता गेल्याचे दुःख नाही, मात्र ज्या पध्दतीने महाराष्ट्राचे राजकारण सुरु आहे हे दुर्दैवी आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

सरकार टिकेल का नाही माहीत नाही, मात्र सर्व आमदार तयारीला लागले आहेत, असेही त्या म्हणाल्या. खासदार सुळे शुक्रवारी रात्री कऱ्हाड (जि. सातारा) दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, सत्यजितसिंह पाटणकर, देवराज पाटील, शहाजी क्षीरसागर, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.

NCP MP Supriya Sule
सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

खासदार सुळे म्हणाल्या, विकास कामांपेक्षा त्यांच्या मेळाव्यांची चर्चा जास्त सुरु आहे. सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेल्या महाविकास आघाडीचे निर्णय स्थगित केले आणि नव्या सरकारकडून विकास कामेही केली जात नाहीत. कोविडचे पैसे आले नाहीत, पिकांची नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलले 'ईडी'चे सरकार हे असंवेदनशील सरकार आहे.

NCP MP Supriya Sule
संतांच्या दर्शनासाठी सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चकवा!

९५ टक्के 'ईडी'च्या केसेस विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. ५० खोके पण ग्रामीण भागात पोहोचले आहेत. आम्हाला सत्ता गेल्याचे दुःख नाही, मात्र ज्या पध्दतीने महाराष्ट्राचे राजकारण सुरु आहे हे दुर्दैवी आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे महाराष्ट्र राज्य आहे.

NCP MP Supriya Sule
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी अन् शिवसेनाही सहभागी होणार ?

आत्ता ज्या पध्दतीने राज्यात राजकारण सुरु आहे, त्याची देशभर चर्चा होते. त्यामुळे आम्हाला प्रचंड वेदना, दुःख होते. न्यायालायावर माझा पूर्ण विश्वास आहे. न्याय देवतेवर विश्वास ठेवला पाहिजे. जरी नाही चिन्ह मिळाले तरी ग्रामपंचायतीला कार्यकर्ते दहा दिवसांत चिन्ह घरोघरी पोचवतात. त्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com