भीमा पट्ट्यात उमेश पाटलांची भूमिका काय असणार?

कुरुल गटात आजपासून उमेश पाटील यांचा जनता दरबार उपक्रम
भीमा पट्ट्यात उमेश पाटलांची भूमिका काय असणार?
Umesh Patil-NCPSarkarnama

सोलापूर : मोहोळ (Mohol) नगरपरिषदेची अंतिम झालेली प्रभाग रचना, मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुका, तालुक्यात असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांची काय भूमिका आहे? याकडे मोहोळ तालुक्याचे व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागरिकांचा जनता दरबार या माध्यमातून उमेश पाटील आजपासून कुरुल (ता. मोहोळ) जिल्हा परिषद गटातील गावांचे दौरे करणार आहेत. भीमा पट्टा म्हणून ओळख असलेल्या कुरुल भागात उमेश पाटील काय बोलणार? आगामी राजकारणाची त्यांची काय दिशा असणार? या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. (Umesh Patil's Janata Darbar activities in Kurul group from tomorrow)

मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्यांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी उमेश पाटील यांनी प्रत्येक गावात ‘नागरिकांचा जनता दरबार’ उपक्रम हाती घेतला आहे. नरखेड व पेनूर जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये हा नागरिकांचा जनता दरबार झाला आहे. कोरोना प्रादुर्भाव, उमेश पाटील यांच्या प्रकृतीचे कारण यामुळे मध्यंतरी नागरिकांचा जनता दरबारमध्ये खंड पडला होता. आता कुरुल जिल्हा परिषद गटातून पुन्हा एकदा नागरिकांचा जनता दरबार उपक्रम सुरू झाला आहे.

Umesh Patil-NCP
अजित पवार नसते तर महाआघाडी सरकारचं टिकलं नसतं : मोहितेंचा खळबळजनक दावा

मधल्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला होता. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत अनगर (ता. मोहोळ) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यास उमेश पाटील गैरहजर होते. परंतु जिल्ह्यातील इतर कार्यक्रमास ते हजर होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोहोळमध्ये झालेल्या परिवार संवाद कार्यक्रमालाही उमेश पाटील गैरहजर होते. पण, जिल्ह्यातील इतर कार्यक्रमास ते आवर्जून हजर होते. या सर्व पार्श्वभूमीवर उमेश पाटील काय भाष्य करणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Umesh Patil-NCP
शिवसेनेच्या संजय पवारांना काँग्रेस-राष्ट्रवादीने दिली पहिल्या पसंतीची १४ मते!

कुरूल (ता. मोहोळ) जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या जनता दरबारला शुक्रवारपासून (ता. १० जून) प्रारंभ होणार आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता वाघोलीवाडी येथे, तर रात्री आठ वाजता सोहाळे येथे नागरिकांचा जनता दरबार होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम सुरू झाला. नागरिकांचा जनता दरबार अशा माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावली जात आहेत.

Umesh Patil-NCP
'आमचं काम फत्ते : ‘आयसोलेट’ असताना फडणवीसांनी काय केले, हे निकालात दिसेल'

शनिवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाच वाजता परमेश्वर पिंपरी, रात्री आठ वाजता कातेवाडी, रविवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाच वाजता बेगमपूर (घोडेश्‍वर), रात्री आठ वाजता मिरी, सोमवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजता अरबळी, रात्री आठ वाजता अर्धनारी येथे नागरिकांचा जनता दरबार होणार आहे. शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाच वाजता वडदेगाव, रात्री आठ वाजता कोथाळे, रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाच वाजता इंचगाव येथे तर रात्री आठ वाजता कुरूल येथे नागरिकांचा जनता दरबार होणार आहे. जनता दरबारच्या माध्यमातून पाटील स्वतः त्या गावात जाणार आहेत. कुरूल जिल्हा परिषद गटातील नागरिकांचा जनता दरबार या अभियानाचा समारोप रविवारी (ता. १९ जून) होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in