उमेश पाटलांनी आता मोहोळमधून निवडणुकीला उभचं राहावं : राजन पाटलांनी दिले चॅलेंज

उमेश पाटील यांना मी मोहोळ तालुक्याची ओळख करून दिली आहे, त्यांना तालुक्यातील एकही कार्यकर्ता ओळखत नव्हता.
Rajan Patil -Umesh Patil
Rajan Patil -Umesh PatilSarkarnama

सोलापूर : उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मोहोळ तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीला उभं राहावं. त्या ठिकाणी आपण ताकद बघू, ही ताकद वर्क्तृत्वात नसते, तर कर्तृत्वात असते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी कुठल्यातरी निवडणुकीला उभं राहावं. त्यांच्या विरोधात मी माझ्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देणार नाही, तर माझा सर्वसामान्य कार्यकर्ता लढेल, अशा शब्दांत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना आव्हान दिले. (Umesh Patil should now contest the election from Mohol : Rajan Patil gave a challenge)

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विधानावर स्पष्टीकरण देण्यासाठी माजी आमदार पाटील यांनी आज (ता. १८ नोव्हेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उमेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असते, त्यांनी वरील माहिती दिली.

Rajan Patil -Umesh Patil
पवारांच्या तिसऱ्या पिढीकडे ‘घोडगंगा’ची सूत्रे; रावसाहेबदादा, अशोक पवारांनंतर ऋषिराज कारखान्याचे अध्यक्ष!

पाटील म्हणाले की, उमेश पाटील यांना मी मोहोळ तालुक्याची ओळख करून दिली आहे, त्यांना तालुक्यातील एकही कार्यकर्ता ओळखत नव्हता. पण, मनोहरभाऊ डोंगरेंसारखे पक्षाचे चांगले कार्यकर्ते माझ्यापासून दूर गेले होते, त्यावेळी माझी मानसिकता थोडी खचली होती. आपला आमदार निवडून आणू की नाही, असे वाटते होते, त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मी उमेश पाटील यांना नरखेडमधून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती

Rajan Patil -Umesh Patil
...तर राष्ट्रवादीच्या बादशहा शेखची दौंड शहरातून धिंड काढेन : आक्रमक राणेंचा इशारा

आमच्या मोहोळ तालुक्यातील मुलगा आहे; म्हणून मी उमेश पाटील यांना मुंबईत ओळखत होतो. उमेश पाटील यांचे वडिल हे आमचे वडिल बाबूराव पाटील यांचे कार्यकर्ते होते. शहाजीराव पाटील यांच्या विरोधातील ही माणसं आहेत. सोलापूर जिल्हा बॅंकेत असताना मला भेटायला उमेश पाटील आले होते. त्यावेळी मला म्हणाले की, ‘जरा बोलायचं आहे.’ उमेश पाटील यांना मी सर्वांसमोरच बोलण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी आपण जिल्हा परिषदेला नरखेडमधून इच्छूक असल्याचे सांगितले होते. त्यावेळी नरखेड खुला झाला होता, असेही पाटील यांनी नमूद केले.

Rajan Patil -Umesh Patil
महाराष्ट्राच्या नादाला लागतो; त्याचा औरंगजेब होतो : शिवसेना उपनेते बानुगडेंचा विरोधकांवर हल्लाबोल

राजन पाटील म्हणाले की, मला माझी राष्ट्रवादी मोहोळ तालुक्यात सांभाळयाची होती. मला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये रस नव्हता. माझा इंटरेस्ट आमदारकीमध्ये होता. शरद पवारांचा उद्याचा उमेदवार निवडून द्यायचा होता. माझ्यापासून मनोहरभाऊंसारखे पक्षाचे चांगले कार्यकर्ते दूर गेले हेाते. त्यावेळी माझी मानसिकता थोडी खचली होती. कदाचित यावेळी आमपण आमदार निवडून आणू की नाही, असे मला वाटत होते. म्हणून बरेजचे राजकारण करण्यासाठी नरखेड मतदारसंघ निवडून आणण्यासाठी आणि आमच्या उमेदवाराला जरा अडचण असल्यामुळे त्यांनी निवडणुकीस नकार दिला होता. त्यामुळे उमेश पाटील यांना मी जिल्हा परिषदेचे तिकिट दिले होते.

माझ्यावर टीका केली की...

उमेश पाटील सध्या असं का वागत आहेत, ते मी कसं सांगणार आहे. मी काय पवारसाहेबांएवढा नाही. पण, जसं पवारांवर टीका केली की मीडियात झळकतंय, तसं मोहोळ तालुक्यात माझ्यावर टीका केली की... असं त्यांना वाटत असेल, असं टोमणाही त्यांनी उमेश पाटील यांना लगावला.

राष्ट्रवादीने माझ्यावर मोठा विश्वास टाकलाय

मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीने आजपर्यंत एकही तिकिट पक्षाचे मर्जीने दिलेले नाही. अगदी आमदारकीचंसुद्धा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in