9 ऑगस्टचा अल्टीमेटम; अन्यथा क्रांतीदिनीच हायवेवर चक्काजामचा शेट्टींचा इशारा

Raju Shetty: ..अन्यथा अकरा वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली जाईल.
Raju Shetty Latest News
Raju Shetty Latest News sarkarnama

कोल्हापूर : उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. शिंदे सरकार (Eknath Shinde) चुकीचे ट्‌विट करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे, प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये प्रोत्साहनात्मक रक्कमेचे पन्नास हजार रुपये 9 ऑगस्टपूर्वी जमा केली नाही तर क्रांती दिनादिवशीच पुणे-बेंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत अकरा वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Sheety) यांनी आज (ता.13 जुलै) दिला. (Raju Shetty Latest Marathi News)

Raju Shetty Latest News
'अहो केसरकर किती बोलता; पवार साहेबांचा 'तो' निरोप घेऊन मीच आलो होतो!'

नियमित व प्रामाणिपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये अनुदानाची रक्कम तात्काळ जमा करावी, पुढील गळीत हंगामात एफआरपीची रक्कम एक रक्कमीच द्यावी व खतांचे दर कमी करुन शेतीचे भारनियम रद्द करावे यासाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान मुसळधार पावसात हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. मोर्चानंतर शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेत बोलत होते.

शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. रक्कम देताना विविध नियम व अटी घातल्यामुळे जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार शेतकरी यापासून वंचित राहत होते. दरम्यान, सरकार अल्पमतात येत असताना यापैकी काही अटी शिथिल केल्या. पण त्याचे अधिकृत परिपत्रक काढले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे शेट्टी म्हणाले.

Raju Shetty Latest News
केसरकरांना शिवसेनेचा इतिहास माहिती नाही; पवारांनी शिवसैनिकांचा स्वाभिमानच जपला...

दरम्यान, हे दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नाही तर अखर्चित रक्कम म्हणून शिंदे सरकार ही रक्कम इतर ठिकाणी वापरणार आहे. पण प्राण गेला तरीही तरतुद केलेल्या रक्कमेपैकी एक रुपयाही इतर ठिकाणी जाऊ देणार नाही. काल मुख्यमंत्री शिंदेंनी 2019 ला ज्यांना मदत मिळण्यास आमची काहीही हरकत नाही, असे ट्विट केले. पण यामध्ये अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत. हे मात्र कोणाच्या लक्षात आलेले नाही. यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या अद्यादेश आहे तसा जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळून जाईल, असे ते म्हणाले. यावेळी, प्रा.जालंदर पाटील, सावकार मादनाईक, अजित पवार आदी उपस्थित होते.

तरच ओके आहे असं समजू

9 ऑगस्टपर्यंत रक्कम जमा झाली. तर सर्व काहीही ओकेच आहे, असं आम्हीही म्हणू नाहीतर ओके नाही. तर तुमच्यासोबत जे-जे आहेत, त्यांना रस्त्यावर फिरणंही मुश्‍किल करु असाही इशारा शेट्टींनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com