उजनीतून 60 हजार क्यूसेकने पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Solapur जिल्ह्यासाठी उजनी धरण हे वरदायिनी ठरले आहे.
Ujani Dam
Ujani DamSarkarnama

पंढरपूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्याची तहान भागविणारे उजनी धरण (Ujani Dam) 100 टक्के भरले आहे. धरणातून आज सायंकाळी सहा वाजले पासून 61 हजार क्युसेक इतके पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. (Discharge from Ujani Dam reached to 61000 cusecs)

Ujani Dam
मी डाव्या बाजूला गेले तर तुम्ही माझ्या सोबत आहेत का? पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य

मागील काही दिवसांपासून भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण 100 टक्के भरले आहे. धरणात सध्या ११८.६६ टिएमसी पाणीसाठी आहे. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी असल्याने धरणातून भीमा नदीत 61 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेले पाणी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत पोचले असून पंढरपुरातील जूना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या गावांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. पाण्यामध्ये आणखी वाढ झाल्यास पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Ujani Dam
Aurangabad Politics : शिरसाटांना 'या' मंत्रीपदाची अपेक्षा: एकनाथ शिंदे पुर्ण करणार का?

पवना धरणातून विसर्गही वाढला...

आज रात्री नऊ वाजता पवना धरणातुन साेडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग ३५०० क्युसेक्स वाढवुण ५५०० करण्यात येणार आहे . तरी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सतर्क रहावे तसेच पाणलाेट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातुन साेडण्यात येणारा विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in