Satara : उद्धव ठाकरेंचा दौरा २४ मिनिटांचा; अडीच वर्षात जमलं नाही ते शंभर दिवसांत केलं...

तुमच्या मंत्रीमंडळात In the cabinet आम्हीही होतो. त्यावेळी आम्ही निर्णय करा, असे सातत्याने सांगत होतो. पण काहीच झाले नाही, असेही मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले.
Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Udhav Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : उद्धव साहेब बाहेर पडले. हा त्यांचा २४ मिनिटांचा दौरा होता, अशी खिल्ली उडवून त्यांना जे अडीच वर्षात निर्णय घेता आले नाहीत ते आम्ही शंभर दिवसांत घेतले. त्यामुळे त्यांनी कितीही टीका केली तरी महाराष्ट्रातील जनतेने सर्वकाही पाहिले आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.

मंत्री देसाई यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टी नुकसानीच्या पहाणी दौऱ्यावेळी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्याला मंत्री देसाई यांनी प्रतिउत्तर दिले.

उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना अशाच भेटी त्यांनी लोकांना दिल्या होत्या काय, त्यामुळे प्रश्न सुटले, असा प्रश्न मंत्री देसाई म्हणाले, उद्धव साहेबांना मला एकच विचारायचे आहे की , नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा त्यांच्याच काळात झाली होती. ते पैसे तुम्ही अडीच वर्षात देऊ शकला नाही. ते आम्ही शंभर दिवसांत दिले.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Marathwada : सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर, उद्या औरंगाबादेत

पहाणीसाठी उद्धव ठाकरे बाहेर पडले, हा २४ मिनिटांचा पहाणी दौरा होता. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त मदत मिळवून दिली आहे. तुमच्या मंत्रीमंडळात आम्हीही होतो. त्यावेळी आम्ही निर्णय करा, असे सातत्याने सांगत होतो. पण काहीच झाले नाही. त्यांना टीका करू देत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. हे सरकार शंभर दिवसांत किती काम करतंय ते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Uddhav Thackeray Marathwada Tour Live : उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com