Uddhav Thackeray Nagar Tour : उद्धव ठाकरे नगरमध्ये ताकद लावणार; लवकरच दौरा अन् पक्षबांधणी !

Uddhav Thackeray Action In Pashchim Maharashtra : "संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत."
Uddhav Thackeray Nagar Tour
Uddhav Thackeray Nagar Tour Sarkarnama

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षाकडून आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ८ सप्टेंबरला नगर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत. यावेळी संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Nagar Tour
Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

नगर जिल्ह्यातील शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व साजन सातपुते यांच्या शिवसेना प्रवेशाने ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ८ सप्टेंबरला नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे आता ठाकरे गट नगर जिल्ह्यात ताकदीने उतरणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर शिवसेना ठाकरे गटात जुने व नवीन असा वाद निर्माण झाला होता. त्याच्या तक्रारी वरिष्ठ पातळीपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे या वादावर ते कशाप्रकारे पडदा टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray Nagar Tour
Jalna Maratha Andolan : भाजप नेत्यांच्या शिष्टाईवर दानवेंचे दोन शब्दातच उत्तर ; म्हणाले, "भाजपा नेत्यांची.."

गेल्या काही दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने या भागातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे या भागातील दुष्काळाच्या परिस्थतीची पाहणी उद्धव ठाकरे हे करणार आहेत. यावेळी संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in