मुख्यमंत्री ठाकरे हे शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकरांचे मनावर घेणार का!

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदाचा सोडवावा : गणेश वानकर
Ganesh Wankar-Uddhav Thackeray
Ganesh Wankar-Uddhav ThackeraySarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढ्यातील (Mangalveda) राजकारण पाण्याभोवती फिरत असून या पाणीप्रश्नावर अनेकांना आमदार होण्याची संधी मिळाली. मात्र, पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकदा काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी शिवसेनेचे (shivsena) सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश वानकर (Ganesh Wankar) यांनी पक्षश्रेष्ठींच्या समोर केली होती. (Uddhav Thackeray should solve problem of Mangalvedha Upsa Irrigation Scheme : Ganesh Wankar)

दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन आणि बार्शी पाणी योजनेची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हाप्रमुख वानकर या पाणी योजनांसाठी आपले वजन खर्ची करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठपुरावा करणार याकडे मंगळवेढा आणि बार्शीकरांचे लक्ष असणार आहे.

Ganesh Wankar-Uddhav Thackeray
विधान परिषदेसाठी मी इच्छूक; पण निर्णय भाजपनं घ्यायचाय : राम शिंदे

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसैनिकांचा मेळावा मंगळवेढ्यात झाला. त्या मेळाव्यात वानकर यांनी पाणी प्रश्नावर भाष्य केले होते. गणेश वानकर म्हणाले होते की, गेली अनेक वर्षांपासून मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न गाजत आहे. पाण्यावरच निवडणुका झाल्या. या पाणी प्रश्नातून अनेकांना लोकप्रतिनिधी होण्याचा मान मिळाला. त्यांनी पाण्यासाठी वेगवेगळी आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात या भागातील शेतीला पाणी आलेच नाही, त्यामुळे या भागात शिवसेना वाढीसाठी गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा पाणीप्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती खासदार बारणे यांच्याकडे केली होती.

Ganesh Wankar-Uddhav Thackeray
रोहित पवारांनी आम्हाला अहिल्यादेवींच्या जयंतीची परवानगी मिळू दिली नाही : राम शिंदे

पंढरपूर-मंगळवेढा भागात शिवसेनेला म्हणणारा मोठा वर्ग असून जागावाटपात ऐनवेळी ही जागा मित्रपक्षाला जाते. विद्यमान भाजप आमदार हे देखील पूर्वी शिवसेनेचे उमेदवार होते, त्यामुळे पक्षीय राजकारणात मित्रपक्षांना मदत करण्याची भूमिका इथल्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे निभावली आहे. स्थानिक पातळीवर इथल्या शिवसैनिकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असल्यामुळे तो आपली निष्ठा बदलत नाही, त्यामुळे या पुढील काळात त्यांना ताकद देण्याची गरज आहे.

Ganesh Wankar-Uddhav Thackeray
फडणवीसांनी भाजपच्या तीनही जागांच्या विजयाचं असं मांडलं गणित!

मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवेढ्याच्या पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात येईल. जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक लावून सकारात्मक भूमिका घेण्याची जबाबदारी पार पाडली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व बार्शी योजनेची फाईल सध्या मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर असल्याचे सांगितले. त्यामुळे आता मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न वानकरांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री निकाली काढणार का याकडे मंगळवेढ्याचे लक्ष लागले आहे.

Ganesh Wankar-Uddhav Thackeray
महाडिकांनी वाढविले शिवसेनेचे टेन्शन : विजयासाठीच्या १० मतांची व्यवस्था झालीय

आवताडे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

मंगळवेढ्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कौंडुभैरी यांनी पोटनिवडणुकीत भाजप आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला होता, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर बंडू चव्हाण यांनीही प्रवेश केला. या दोघांना खासदार बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com