फडणवीसांच्या 'त्या' दाव्याची ठाकरेंकडून चिरफाड; जाहिर यादीच वाचून दाखविली

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | Kolhapur : कोल्हापुरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे?
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
Devendra Fadnavis & Uddhav ThackeraySarkarnama

कोल्हापूर : कोल्हापुरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे, एकतरी विकास दाखवू शकतात का? आमच्या सरकारच्या काळात झालेली कित्येक कामे आम्ही दाखवू शकतो. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सरकार स्वत:पलिकडे पाहू शकत नाही, अशी भावना लोकांची झाली आहे, असा दावा आज 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आयोजित सकाळी पत्रकार परिषदमध्ये बोलताना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्याची आज संध्याकाळी कोल्हापूर उत्तरसाठी आयोजित ऑनलाईन प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जाहीर चिरफाड केली. ठाकरे यांनी कोल्हापुरसाठी महाविकास आघाडीने केलेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवत फडणवीस यांच्या या टीकेला उत्तर दिले. ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूर महापालिकेच्या अनेक विकासकामांसाठी अर्थसंकल्पात भरीव मदत केली. सोबतच करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिराच्या विकासकामाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कोरोना, पूर परिस्थिती याकाळात भरीव मदत केली.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
सतेज पाटील भावूक : "कसबा-बावडाकरांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं"

तसेच शाहु समाधीस्थळ, विमानतळ या ठिकाणांच्या विकासकामांना महाविकास आघाडी सरकारने निधी देत गती दिली आहे. कोल्हापुरमधील जिल्हा प्रशासकीय इमारत, करवीर तहसील कार्यालय इमारत, राजर्षी शाहु महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार आणि विकास आपण करत आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, आणखी एक मुद्दा विरोधकांनी काढला. तो म्हणजे, कोल्हापूर खंडपीठाचा. तर त्याबाबतही आपली मुख्य न्यायाधीशांसोबत चर्चा आणि संवाद सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray
कोल्हापुरात अशोक चव्हाणांनी घेतली नागेश पाटलांची भेट; २ वर्षांपूर्वीचा शब्द आठवणीने पाळला

याशिवाय कोल्हापुरमधील रंकाळ्यासह जिल्ह्यातील विविध तलावांसाठीची काम सुरु केली आहेत. रंकाळा तलावात येणारे सांडपाणी थांबवले आहे, थोडेफार आहे ते देखील येत्या काळात थांबेल आणि काळा पडलेला रंकाळा पुन्हा तजेलदार होईल, असा आशावाद मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच पंचगंगेत येणारे सांडपाणी आपण स्वच्छ करत आहोत. आणि आपली पंचगंगा स्वच्छ असली पाहिजे यासाठी आम्ही घोषणा नाही, तर काम करत आहोत. त्यासाठी एकूण खर्च जवळपास २०० कोटी रुपये आहे. इचलकरंजीमध्ये २० एमएलडीचे काम पूर्ण झालेले आहे. त्याचे काम ४० कोटीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com