एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलिन करण्याचा उद्धव साहेबांचा प्रयत्न...

शिवसेनेचे आमदार Shivsena MLA पुढील विधानसभेला Next Vidhansabha कसे पराभूत होतील, याचे षडयंत्र राष्ट्रवादीकडून NCP चालले होते, असे शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले.
Shambhuraj Desai, Udhav Thackeray
Shambhuraj Desai, Udhav Thackeraysarkarnama

सातारा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. शिंदे साहेब हे हाडाचे शिवसैनिक असून ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानतात हे महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक व जनतेला माहिती आहे, असे प्रतिउत्तर शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिध्द झाला असून त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले. शंभूराज देसाई म्हणाले, मुलाखतीच्या दुसरा भागात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेंनी कधीही मी फार मोठा आहे, अशी भूमिका घेतलेली नाही.

Shambhuraj Desai, Udhav Thackeray
मी अगदी शेवटच्या क्षणीही त्यांना विचारलं होतं...; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन वाटचाल करत आहेत. शिवसेना प्रमुखांशी तुलन करण्याचा काडीमात्र, संबंधन नाही. कोणीही तसा उल्लेख ही केलेला नाही. याउलट उद्धव साहेब त्यांची प्रतिमा लोकांच्या मनात मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक व जनता हे हाडाचे शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना मानतात. मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, त्यावेळी खूर्चीच्या मागे त्यांनी बाळासाहेबांची प्रतिमा लावली आहे. त्यांनी गुरूंना स्मरूणच त्यांचे हे सर्व चालले आहे.

Shambhuraj Desai, Udhav Thackeray
sanjay raut video : देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचं चॅलेंज

बंडखोरांनी आधी भूमिका का घेतली नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. त्याविषयी विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले, टाळी एका हाताने वाजत नाही. टीका मातोश्रीवर झाली, उद्धव साहेबांवर झाली. त्यावेळी दुसऱ्या बाजूने संजय राऊत टीका करत होते. ते भाजपवर कोणत्या भाषेत टीका करत होते, हे पहावे. त्यामुळे टाळी एका हाताने वाजत नाही. शिवसेनेतील ५१ आमदारांनी भूमिका घेतली त्यामुळे पुन्हा एकदा भाजप व शिवसेनेचे सरकार सत्तेत आलेले आहे.

Shambhuraj Desai, Udhav Thackeray
पालापाचोळ्याची उपमा योग्य नाही; उद्धव साहेबांच्या तोंडी राऊतांची भाषा... शंभूराज देसाई

ज्यावेळी आमचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले होते की, उद्धव साहेब आम्हाला आदरणीयच आहेत. त्यावेळी दुसऱ्या बाजूने संजय राऊत या व्यक्तीने बेसलेस टीका केल्यानंतर त्याबाजूने उत्तर आले. त्यालाही उत्तर देण्याचे काम आम्ही केलं. किरीट सोमय्यांनाही आम्ही त्यावेळी उत्तर दिलेले आहे. अडीच वर्षात शिवसेना संपत चालली असून पक्ष अंतर्गत संपविला जात होता. सेनेचे आमदार पुढील विधानसभेला कसे पराभूत होतील, याचे षडयंत्र राष्ट्रवादीकडून चालले होते.

Shambhuraj Desai, Udhav Thackeray
Satara : अजित पवारच सरकार चालवत होते...शंभूराज देसाईंचा आरोप

शिवसेना संपविण्यापासून वाचविण्याचे काम आम्ही ५१ आमदारांनी केलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना व त्यांचे हिंदुत्वाचे विचार वाचवून पुढे घेऊन चाललो आहोत. ही भूमिक घेतली नसती तर २०२४ च्या विधानसभेला शिवसेनेचे केवळ १५ ते २० आमदार निवडून आले असते, असे काम राष्ट्रवादीकडून चाले होते. ते वेळीच थांबविण्याचे काम आम्ही सगळ्यांनी केले आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्रीच आहेत त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब यांनी शूभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या असून आम्हीही त्यांना तशाच पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com