Udayanraje Bhosale :'नगरोथ्थान'च्या निधीवरून उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला; म्हणाले,''काही टपून बसलेल्या...''

Satara News: नेहमीच्या श्रेय घेण्याच्या सवयीची....
udayanraje bhosale, shivendraraje bhosale
udayanraje bhosale, shivendraraje bhosaleSarkarnama

Satara News : सातारा शहरातील हद्दवाढ भागासह इतर कामांचे प्रस्ताव सातारा विकास आघाडीने सूचवले होते. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सर्वांच्या सकारात्मक सहकार्यामुळे सातारवासियांसाठी 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

पण काही टपून बसलेल्या व्यक्तींना याची माहिती होताच नेहमीच्या श्रेय घेण्याच्या सवयीची टिमकी वाजवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा नामोल्लेख टाळत लगावला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हणाले, सातारा शहर व हद्दवाढ भागातील विकासासाठी काही कामे सातारा विकास आघाडीने सुचवली होती. त्याचा पाठपुरावाही केला होता.

udayanraje bhosale, shivendraraje bhosale
Satara News : शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; विकासकामांना १२ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर

या कामांमध्ये हॉटेल अजंठा चौक, राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या ठिकाणी जागा विकसित करणे याकरीता एक कोटी 87 लाख रुपये, अजिंक्यतारा किल्ला रस्ता विकसित करणे भाग एक आणि दोन असे मिळुन रुपये 3 कोटी 45 लाख रुपये, (दोन कामे), श्री. टोपेमामा दत्त मंदिर अखेर रस्ता डांबरीकरण करणे 1 कोटी 99 लाख रुपये, सातारा शहर पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त करणे रुपये 76 लाख 40 हजार ही कामे मार्गी लावली जाणार आहे.

तसेच सातारा शहरातील मुख्य रस्त्यांना थर्मोप्लास्ट पेंट मारणे व रहदारीच्या विविध उपाययोजना करणे याकरीता 52 लाख रुपये, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज चौक (बॉम्बेरेस्टॉरंट) ते मंगलमूर्ती रेसिडेन्सी अपार्टमेंट अखेर गटर करणे रुपये 1 कोटी 60 लाख रुपये असा एकूण 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर होवून प्राप्त झाला आहे.

ही कामे लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्याबरोबरच दर्जेदार पध्दतीने करुन घेण्यावर सातारा विकास आघाडीचे आणि आमचे स्वतःचे लक्ष राहणार आहे.

udayanraje bhosale, shivendraraje bhosale
Jacinda Ardern Resignation : खरा नेता तो..ज्याला योग्य वेळ कळते.. ; जगातील सर्वात तरुण पंतप्रधानाचा राजीनामा..

तसेच नियोजन समितीमधुन वरील मंजूर कामांव्यतिरिक्त आणखी काही विकास कामांचे प्रस्ताव सातारा विकास आघाडीने आमच्या माध्यमातुन दिले आहेत. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत, सातारा नगरपरिषदेचे प्रशासक यांनी 183 विविध लोकोपयोगी विकास कामे मंजूर केली आहेत. ही सर्व कामे सातारा शहर आणि हद्दवाढ भागातील आहेत.

ही कामे सुध्दा निविदा सोपस्कार पूर्ण झाल्यावर लवकरच सुरु होवून चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील याकडे प्रशासनाने लक्ष दयावे अशी सूचनाही पालिका प्रशासनाला केल्या आहेत असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com