शिवेंद्रसिंहराजेंच्‍या सेल्‍फी पॉइंटवर उदयनराजेंनी घेतली सेल्फी

उदयनराजेंनी सेल्‍फी पॉइंटच्‍या कामाची पाहणी करत माहिती घेतली. याच दरम्‍यान त्‍यांनी सेल्‍फी पॉइंटवर सहकाऱ्यांसमवेत फोटोसेशनही केले.
Udayanraje Bhosale on Selfie Point
Udayanraje Bhosale on Selfie Pointsarkarnama

सातारा : साताऱा शहरातील पोवई नाका परिसरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वखर्चातून उभारलेल्‍या 'राजधानी सातारा' या सेल्‍फी पॉइंटला आज दुपारी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. या ठिकाणच्‍या कामाची पाहणी करत उदयनराजेंनी सहकाऱ्यांसमवेत फोटोसेशनही केले. या फोटोसेशनमुळे लोकार्पण होण्‍याआधीच 'राजधानी सातारा' हा सेल्‍फी पॉइंट साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला.

साताऱ्यात पोवई नाका परिसरातील वाहतुकीची कोंडी टाळण्‍यासाठी या ठिकाणी ग्रेडसेपरेटर उभारण्‍यात आला आहे. ग्रेडसेपरेटरच्‍या कामादरम्‍यान, येथील आयलँड, दुभाजक हटविण्‍यात आले होते. या ठिकाणी असणाऱ्या टपाल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेचे स्‍वखर्चातून सुशोभीकरण करत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सेल्‍फी पॉइंट उभारण्‍याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्‍याचे काम पूर्ण झाले असून या पॉइंटचे लोकार्पण आज सायंकाळी होणार होते.

Udayanraje Bhosale on Selfie Point
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा...

त्यासाठीची तयारी त्‍या ठिकाणी सुरू असतानाच खासदार उदयनराजे हे शासकीय विश्रामगृहातून त्‍या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्‍यांच्‍यासोबत नगरसेवक ॲड. दत्ता बनकर, जिल्‍हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर व इतर सहकारी होते. याठिकाणी थांबत उदयनराजेंनी सेल्‍फी पॉइंटच्‍या कामाची पाहणी करत माहिती घेतली. याच दरम्‍यान त्‍यांनी सेल्‍फी पॉइंटवर सहकाऱ्यांसमवेत फोटोसेशनही केले. फोटोसेशननंतर त्‍यांनी कामाबाबत समाधान व्‍यक्‍त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com