उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे समर्थक आमने-सामने; विकास कामांवरून श्रेयवाद रंगला....

सातारा पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राजे व त्यांच्या समर्थकांतील वाद चव्हाट्यावर आला असून या कलगीतुऱ्याने सातारकरांची मात्र, करमणूक होत आहे.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosaledesign@apglobale.com

सातारा पालिकेची निवडणूक (Satara Municipal Election) जवळ आल्याने सातारा शहरातील विकासकामांचा श्रेयवाद उफाळून आला आहे. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीकडून लावलेल्या बॅनरला आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकर्त्यांनी काम कुणाचं आणि नाचतंय कोण.. असा प्रश्न उपस्थित करणारा बॅनर लावला. त्यावर उदयनराजेंच्या समर्थकांनी काम आमचचं...म्हणूनच ठासून बोलतो...असा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राजे व त्यांच्या समर्थकांतील वाद चव्हाट्यावर आला असून या कलगीतुऱ्याने सातारकरांची मात्र, करमणूक होत आहे.

सातारा पालिकेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. यावेळेस दोन्ही राजांच्या आघाड्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल अशी तिरंगी लढतीची शक्यता आहे. पण अद्यापपर्यंत राष्ट्रवादीकडून केवळ आमदार शशीकांत शिंदे सोडले तर अन्य कोणीही याबाबत दुजोरा दिलेला नाही. तर दोन्ही राजे भाजपमध्ये असल्याने पालिकेत या दोघांपैकी कोणाची ही सत्ता आली तरी ती भाजपचीच असणार अशा भूमिकेत भाजपचे नेते आहेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
चंद्रकांत पाटलांवर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार: संजय राऊत

सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान सत्ताधारी सातारा विकास आघाडीने आता विकास कामांच्या उद्‌घाटने व भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. तसेच हद्दवाढीत सहभागी झालेल्या उपनगरात जास्तीत जास्त निधी देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार उदयनराजेंच्या हस्ते सातारा विकास आघाडीने विविध विकास कामांची उद्‌घाटने सुरू केली आहेत. यातूनच त्यांनी पोवई नाक्यावर गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी सीआरएफ निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या 15 कोटीच्या मार्गाचा शुभारंभ 22 तारखेला घेणार असल्याचे बॅनर लावले होते.

त्यांच्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्या नगरविकास आघाडीने त्याच्या बाजूलाच बॅनर लावत काम कुणाचं आणि नाचतंय कोण? असा प्रश्न विचारत कधी तरी खरं बोला असा बॅनर लावला आहे. आणि विशेष म्हणजे, या बॅनरवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार हे काम नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे पत्रच या बॅनरवर छापले आहे. त्यामुळे आता हा बॅनरची चर्चा झाली आहे.

Satara Banners
Satara Bannerssarkarnama

मात्र, या दोन्ही बॅनरवर सातारा पालिकेने कारवाई करत हे बॅनर हटविले, पण त्यातून निर्माण झालेली चर्चा आगामी निवडणुकीसाठी महत्वाची ठरणार आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे समर्थकांनी एक पाऊल पुढे जात सोशल मीडियावर आणखी एक बॅनर टाकला. यामध्ये त्यांनी म्हटले की, काम आमचचं...म्हणूनच ठासून बोलतो..!, यामुळे आणखीणच वातावरण तापले आहे. एकुणच काय नेहमी प्रमाणे सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजांच्या विकास आघाड्यातच लढाई होणार हे निश्चित झाले आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते सातारा पालिकेत पॅनेल टाकण्याबाबत काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागली आहे. त्यांचे पॅनेल झाले तर तिरंगी अन्यथा दोन्ही राजांच्या आघाडीतच दुरंगी लढत रंगणार हे निश्चित आहे.

Udayanraje Bhosale Banner
Udayanraje Bhosale Bannersarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com