साताऱ्यातील दोन राजांत कलगीतुरा... अहो, पालिकेची निवडणूक जवळ आलीय!
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosaledesign@apglobale.com

साताऱ्यातील दोन राजांत कलगीतुरा... अहो, पालिकेची निवडणूक जवळ आलीय!

खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाद आजचा नाही. आजपर्यंत या दोन्ही राजांचे दोनदा मनोमिलन झाले पण पालिका निवडणुकीवरून दोघांतील वाद मिटलेला नाही.

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने सातारच्या दोन राजांतील वाद उफाळून आलेला आहे. एकमेकांची ऊणी दुणा काढण्यापर्यंत हा वाद गेलेला आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा पालिकेत खासदार उदयनराजेंच्या विकास आघाडीने कामांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्यावर बोट ठेऊन उदयनराजेंवर सडेतोड टीका केली आहे. तर खासदार उदयनराजेंनी हिंमत असेल तर समोरासमोर येऊन बोला असे आव्हान दिले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या या दोन नेत्यांची कलगीतूरा रंगला आहे. यातून सातारकरांचे मात्र, करमणूक होत आहे.

सातारा पालिकेची निवडणुकीचे पडघम सध्या वाजू लागले आहेत. यावेळेस दोन्ही राजांच्या दोन विकास आघाड्यांमध्ये लढत होणार असे चित्र दिसत आहे. पण, दोन्ही राजे भाजपमध्ये असल्याने यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारी मंडळी पक्षाने पालिकेत पॅनेल टाकावे, अशी मागणी करू लागले आहेत. त्यासाठी खुद्द आमदार शशीकांत शिंदेंनी मध्यंतरी पुढाकार घेतला होता. पण त्यानंतर पुढे कोणतीच हालचाल झालेले नाही. त्यामुळे दोन्ही राजांच्या आघाडी सोडून राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची मात्र, सध्यातरी निराशा दिसत आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
मी दुचाकीवरून जाईन नाहीतर, शीटवर उभा राहून जाईन; दुःख वाटत असेल तर तुम्ही करा...

सध्या पालिका निवडणुकीच्या तोंडावरच दोन्ही राजांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. एकमेकांवर अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्यापर्यंत मजल गेलेली आहे. सातारा पालिकेत राष्ट्रवादीचे पॅनेल होईल, याअपेक्षेने सर्व पक्षांच्या प्रमुख मंडळींचे लक्ष साताऱ्यावर आहे. पण, आमदार शशीकांत शिंदेंनी सुरवातीला ज्या वेगाने पुढाकार घेतला, तो वेग निवडणुक जवळ आलेली असताना मंदावला आहे. त्यामुळे तिसऱ्या पॅनेलचे भवितव्य सध्यातरी अधांतरीच दिसत आहे. सातारा पलिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राजें विकास कामांवरून एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
पाच वर्षांत कामे केली असती तर, दुचाकीवर फिरावे लागले नसते...

यातून सातारकरांची नेहमीची करमणूक होत असली तरी सातारा पलिकेत गेल्या पाच वर्षांत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने केलेली विकास कामे व निवडणुक लागली म्हणून दररोज फोडले जाणारे भूमिपूजनाचे नारळ यावरून विरोधी नगर विकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादीची खेळी; उदयनराजेंचा निर्णय सोपविला शिवेंद्रसिंहराजेंवर

पाच वर्षात विकास कामे केली असती तर उदयनराजेंना दुचाकीवरून फिरावे लागले नसते. विकास कामांची नौटंकीच उदयनराजेंकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवेंद्रसिंहराजेंना केला होता. त्याला प्रतिउत्तर देताना उदयनराजेंनी आम्ही कामेच करतो, त्यामुळे आम्ही दुचाकीवरून हिंडू किंवा चालत फिरेन, नाहीतर लोळत फिरेन, तुम्हाला दुःख होत असेल तर तुम्ही फिरा..असा टोला लगावला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
`रामराजे-उदयनराजे मनोमीलन, एकमेकांना म्हणाले `टेक केअर!`

तसेच आम्ही कोणतीही गोष्ट केली तरी सातारच्या जनतेला कामे पाहिजेत. कामे करायचे नाहीत आणि आम्हाला नावं ठेवायची ह्याच्यावरून गेले त्याच्यावरून गेले. कामे केली असती तर लोकांनी नाव ठेवली नसती. हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हान त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहे. एकुणच पालिका निवडणुकीवरून दोन्ही राजे आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे यावेळेस सातारा पालिकेची निवडणूक घमासान होणार हे निश्चित आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
रामराजे आणि शिवेंद्रराजे यांचे संगनमत - उदयनराजे भोसले

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाद आजचा नाही. आजपर्यंत या दोन्ही राजांचे दोनदा मनोमिलन झाले पण पालिका निवडणुकीवरून दोघांतील वाद मिटलेला नाही. सातारा पालिकेच्या मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या नगर विकास आघाडीकडून त्यांची पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांना उमेदवारी दिली होती. तर त्याविरोधात उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने सर्वसामान्य घरातील महिला माधवी कदम यांना रणांगणात उतरविले होते. शेवटी सातारकरांनी राजघराण्यातील सुनेला टाळून सर्वसामान्य घरातील महिलेला नगराध्यक्ष केले. पत्नीच्या पराभवाचा याचा राग आमदार शिवेंद्रसिंहराजेंना आहे. त्यामुळे ते पालिकेची निवडणूक असो की जिल्हा बँकेची निवडणूक ते उदयनराजेंवर सडेतोड टीका करतात. आता यावेळेस नगराध्यक्षाची निवड नगरसेवकांतून होणार आहे. त्यामुळे यावेळेस दोन्ही राजांच्या आघाड्या कोणाला नगराध्यक्ष बनविणार याची सातारकरांत उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.