Udayanraje Bhosale : कोश्यारी, त्रिवेदी यांना पदावरून तात्काळ हटवा ; उदयनराजेंचे मोदींना पत्र!

Udayanraje Bhosale : राज्यपाल हे घटनात्मक पद असताना देखील दिवसेंदिवस या पदाची प्रतिष्ठा रसातळाला गेली आहे
Udayanraje Bhosae
Udayanraje BhosaeSarkarnama

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे उमटलेले पडसाद अजूनही काही थांबायचे चिन्हं दिसत नाही. खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणाची थेट तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या दोन्ही व्यक्तींना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे

उदयनराजे भोसले यांच्या निवेदनात नमूद आहे की, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याचा नंतर अफगाणिस्तानापर्यंत विस्तार झाला. समाजात सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली आणि तोच विचार आता पुढे नेत आहोत. मात्र काही व्यक्ती महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवत आहेत.

महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायां विषयी वादग्रस्त वक्तव्य करून हा प्रकार घडवून आणला आहे. कोशारी यांनी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणून त्यांना स्वराज्य स्थापन करता आले, असे आशयाचे विधान केले होते. त्यावरून छत्रपती शिवरायांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.

Udayanraje Bhosae
Ravikant Tupkar : हिंमत असेल तर अडवाच, जलसमाधी घेणारच : एक हजार शेतकऱ्यांना घेऊन तुपकर मुंबईकडे रवाना

कोश्यारी यांनी यापूर्वीही महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल संतापजनक वक्तव्य केले होते. ही वक्तव्य त्यांची जाहीर कार्यक्रमामधली आहेत. जनमानसातून निषेध होऊ होत आहे, ते स्वतः बदलायला तयार नाहीत. त्यांची महाराष्ट्रातील अडीच वर्ष कारकीर्द होऊनही त्यांना शिवराय न समजण्याची बाब दुर्दैवी आहे.

Udayanraje Bhosae
Sharad Pawar : शरद पवार 'इन अॅक्शन मोड' ; आज राष्ट्रवादीची महत्त्वाची आढावा बैठक!

राज्यपाल हे घटनात्मक पद असताना देखील दिवसेंदिवस या पदाची प्रतिष्ठा रसातळाला गेली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे इतिहास संशोधक नाहीत. तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजनक वक्तव्य केले, त्याचा आम्ही निषेध करतो. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोशारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना तातडीने पदावरून दूर करावे आणि तमाम जनतेची मागणी आहे. या मागणीवर योग्य ती कार्यवाही होईल, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in