Udayanraje : नरेंद्र पाटलांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल…

Udayanraje : नरेंद्र असो, शिवेंद्र असो, उदयन असो नावे हे गौण आहेत, पण...
MP Udayanraje Bhosale Latest News
MP Udayanraje Bhosale Latest Newssarkarnama

सातारा : शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करु शकत नाही. कदाचित नरेंद्र पाटील हे फार मोठे विचारवंत असतील किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल, अशी खोचक टीका भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje ) यांनी केली आहे. (MP Udayanraje Bhosale Latest News)

MP Udayanraje Bhosale Latest News
Ajit Pawar: अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली 'त्या' मुलाखतीची आठवणं...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल साताऱ्यात छत्रपतींची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.पण, त्यांच्या कार्याशी नेत्यांच्या कार्याची तुलना करायला काही हरकत नाही,असे वक्तव्य केले होते.

त्याबाबत खासदार उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले की, आज एक जण बोलत आहेत. उद्या आणखी काहीजण बोलतील. नरेंद्र असो, शिवेंद्र असो, उदयन असो नावे हे गौण आहेत, पण विचार महत्वाचा असतो.तुम्ही आम्ही गेल्यानंतर आपल्या पलीकडे कोणी दिसत नाही. माझ्या आयुष्यात मी या बाबतीत आवाज उठवला नाही तर माझ्यासारखा दुर्दैवी मीच असेन, अशा शब्दात उदयनराजेंनी आपलं मत मांडलं.

MP Udayanraje Bhosale Latest News
Sushma Andhare : महिला मुख्यमंत्र्यांच्या रेस मध्ये नाही, हे केवळ कंड्या पिकवण्याचे काम…

ते पुढे म्हणाले की, जे बोलले ते फार विचारवंत असतील किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल, पण शिवाजी महाराजांची बरोबरी कोणी करू शकत नाही. ज्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सांगणे गरजेचे आहे. कारण लोकशाहीतील तुम्ही राजे आहात, तुम्ही सगळे सज्ञान आहात. विचार करून बोलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com