उदयनराजेंनीच सातारा लोकसभा लढवावी; पावसकरांच्या विधानाचा विपर्यास झाला...

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimabalkar म्हणाले, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale व सातारा Satara हे एक वेगळेच समीकरण आहे. आगामी काळामध्ये सुद्धा तेच समीकरण बरकरार राहिल.
Ranjitsinh Nimbalkar, Vikram Pawaskar, Udayanraje Bhosale
Ranjitsinh Nimbalkar, Vikram Pawaskar, Udayanraje Bhosalesarkarnama

फलटण : खासदार उदयनराजे भोसले यांना दुखावण्याचा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा कोणताही हेतू किंचतही नव्हता व आगामी काळातही नसेल. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनीच सातारा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी. भारतीय जनता पार्टीला जर पुन्हा मला संधी द्यायची असेल तर त्यांनी माढा मतदारसंघातूनच द्यावी, असे स्पष्टीकरण भाजपचे माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

फलटण येथे झालेल्या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी चेस्टा मस्करीत केलेल्या विधानाचा विपर्यास झाला आहे, असे सांगून खासदार निंबाळकर म्हणाले, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व सातारा हे एक वेगळेच समीकरण आहे. आगामी काळामध्ये सुद्धा तेच समीकरण बरकरार राहिल. सातारा लोकसभा मतदारसंघामधून उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देण्यात यावी. भारतीय जनता पक्षाला जर खासदारकीसाठी माझा पुन्हा विचार करायचा असेल तर, तो माढा लोकसभा मतदारसंघासाठीच करावा.

Ranjitsinh Nimbalkar, Vikram Pawaskar, Udayanraje Bhosale
शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात : चंद्रकांत पाटलांचा टोला

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि मी जवळचे मित्र आहोत. उदयनराजे भोसले यांची जागा मी कधीही घेऊ शकत नाही. विक्रम पावसकर यांनी केलेल्या विधानाने उदयनराजे भोसले यांना दुखावण्याचा किंचतही हेतू नव्हता व आगामी काळामध्ये सुद्धा नसेल. उदयनराजे भोसले हे अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व असून त्यांचा स्वभाव सुद्धा दिलदार आहे, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

Ranjitsinh Nimbalkar, Vikram Pawaskar, Udayanraje Bhosale
उदयनराजे नकोसे? साताऱ्याचा पुढचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व्हावेत...

उदयनराजे भोसले हे माझ्या पाठीशी कायमच ठामपणे उभे आहेत. मी केलेल्या कोणत्याही संघर्षात मग अगदी तो नीरा देवधरचा संघर्ष असला तरी ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी कधीही मागे पुढे सुध्दा बघितले नाही. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत उदयनराजे भोसले यांनीच सातारा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी. भारतीय जनता पक्षाला जर पुन्हा मला संधी द्यायची असेल तर, त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून संधी द्यावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com