मी रांगत फिरीन, लोळत फिरीन, तुम्ही डोक्यावर फिरा ; उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना सुनावलं

उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी काही दिवसापूर्वी दुचाकीवरुन फेरफटका मारला होता. यावरुन आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje) यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती.

मी रांगत फिरीन, लोळत फिरीन, तुम्ही डोक्यावर फिरा ; उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना सुनावलं
Udayan Raje Shivendra Rajesarkarnama

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी काही दिवसापूर्वी दुचाकीवरुन फेरफटका मारला होता. यावरुन आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje) यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'हिमंत असेल तर समोर या' असे आव्हान त्यांनी शिवेंद्रराजेंना केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज प्रतापगड येथील भवानी मातेच्या मूर्तीची विधिवत पूजा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवेंद्रराजेंवर पलटवार केला. उदयनराजे म्हणाले, ''मला चारचाकी परवडत नाही, मग काय झाले, मी दुचाकीवरुन फिरीन, चालत फिरीन, रांगत फिरीन, माझे गुडगे दुःखतात, मी कसंपण फिरीन, मी लोळत फिरीन. काही राज्यामध्ये सुटका झाली की मंदिरामध्ये लोटांगण घालतात, तसे लोटांगण घालीन, कुणाचा काय प्राँब्लेम आहे. त्यांच्याबाबत कुणाला दुःख वाटत असेल तर त्यांना कुणी थांबविलं आहे. लोकशाही आहे. मी दुचाकीच्या सीटवर फिरत होतो, तुम्ही सीटवर उभे राहून फिरा. डोक्यावर फिरा,'' अशा खोचक शब्दात त्यांनी शिवेंद्रराजेंना सुनावले.

Udayan Raje  Shivendra Raje
गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला दहा हजारांची लाच घेताना अटक

''जनतेला कामे पाहिजे आहेत, कामे करायचे नाही, अन् यांनी असं केलं तसं केलं. नाव ठेवायला कुठ अक्कल लागत नाही. पण काहींना कॉमन सेन्स नसतो. पहिल्यांदा कामे करा, असा टोला उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता लगावला. हिमंत असेल तर समोरासमोर या. मग त्यावेळेस का मागे फिरतात. नियोजीत कार्यक्रमांमुळे येऊ शकलो नाही, असं सांगतात. त्यांची कसली नियोजीत कामे असता,'' असा प्रश्न उदयराजेंनी यावेळी उपस्थित केला.

''मी जनतेला सेवक असून सर्वसामान्यांची सेवा करणं हाच माझा पूर्वनियोजीत कार्यक्रम असतो, असे सांगून ते म्हणाले, ''आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. देशाची प्रगती, आपल्या सगळ्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा, मलाही तुम्ही दुचाकीवरुन चारचाकीवर पाहा,'' असे टोमणा त्यांना यावेळी लगावला. उदयराजेंच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.

Related Stories

No stories found.