लालमहालातील चित्रीकरणावरून उदयनराजे संतप्त; म्हणाले दोषींवर कडक कारवाई करा...

मुळात ही वास्तू पुणे pune महानगर पालिकेच्या Mahapalika ताब्यात असून या चित्रिकरणासाठी For filming महापालिकेची रितसर परवानगी Permission घेतली आहे का?
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : लालमहाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र, या ठिकाणी कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण, या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचं आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या पत्रकात खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, लालमहाल ही वास्तू सिनेमातील नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही. याचे संबंधितांनी भान ठेवायला हवं होतं.

MP Udayanraje Bhosale
माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, दाखवतो सगळ्यांना... खासदार उदयनराजे

ज्यांनी कोणी हे चित्रीकरण केले असेल, त्यांनी ते चित्रीकरण सिनेमात वापरू नये. तसेच हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी. लालमहाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र, या ठिकाणी कोणतही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण, या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचं आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी.

MP Udayanraje Bhosale
Video : सत्तेचा दुरूपयोग करणे चुकीचे : उदयनराजे

मुळात ही वास्तू पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात असून या चित्रिकरणासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली? तसेच जर परवानगी दिली असेल कर कोणत्या अटी व शर्तींवर परवानगी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे? त्याचबरोबर जे चित्रिकरण झाले असेल ते तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in