साताऱ्यात जाऊन राजेगटाला उदय सामंतांचे आव्हान : आम्हाला कमी लेखू नका...

सामंत म्हणाले, ''शिवसैनिकांनी मेरिटचे संघटन कौशल्य राबवावे आणि निवडणुकीचे तिकिट मिळवावे अशी खुली ऑफर त्यांनी दिली.

साताऱ्यात जाऊन राजेगटाला उदय सामंतांचे आव्हान : आम्हाला कमी लेखू नका...
Uday Samantsarkarnama

सातारा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना पूर्ण क्षमतेने लढणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूत्र असणार की नाही याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. सेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर उमेदवार लढतील. सातारा पालिकेच्या किमान पंधरा जागा आम्ही लढवू. यश किती कसे असेल माहित नाही. पण, चिवट संघर्ष हा सेनेचा बाणा आहे, अशी माहिती उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

साताऱ्यात सातारा तालुका व शहर परिसरातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत म्हणाले, "सातारा शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा प्रथमच होत आहे . संघटनात्मक पातळीवर शाखा विस्तारीकरणाचे काम सुरु आहे . सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून शिवसेना सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण क्षमतेने व पक्षचिन्हावर लढण्याची धारणा आम्हा शिवसैनिकांची धारणा आहे. पण राजकारणात काही तत्कालीन परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे लागतात.

Uday Samant
उदय सामंत म्हणाले, `कोणाच्याही दादागिरीला मी घाबरत नाही !`

राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र राबविण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, तो जे आदेश देतील त्या आदेशाला आम्ही शिवसैनिक म्हणून बांधील असू अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. साताऱ्यातील राजेगटाचा प्रभाव , सेनेची सुप्तावस्थेतील महिला आघाडी आणि संघटनात्मक बांधणीला ऐननिवडणुकीच्या तोंडावर किती यश मिळणार या प्रश्नांना सुद्धा सामंत यांनी उत्तरे दिली.

Uday Samant
केंद्राकडून लस उपलब्ध होताच, मुलांचे लसीकरण : अजित पवार

ते पुढे म्हणाले, साताऱ्यात आम्ही संख्येने दिसायला कमी जरी असलो तरी आम्हाला कमी लेखू नका. राजकारणात काही घडू शकतं. कोणाचा कसा उदय होईल याचा नेम नाही. राज्यात 105 आमदार देणारा पक्ष आज विधानसभेत विरोधात आहे हे उदाहरण तुमच्यासमोर आहे. साताऱ्यात राजेगटाचा प्रभाव असला तरी जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीची सुरवात साताऱ्यातून आहे. ही आमची पहिलीच बैठक आहे. सेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर उमेदवार लढतील. सातारा पालिकेच्या किमान पंधरा जागा आम्ही लढवू, यश किती कसे असेल माहित नाही. पण, चिवट संघर्ष हा सेनेचा बाणा आहे.''

साताऱ्यातील सेनेच्या राजकीय हालचाली गृहराज्यमंत्र्यांना मान्य आहेत का ? असे विचारताच सामंत म्हणाले, ''सर्व गोष्टीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात, तो आदेश गृहराज्यमंत्री सुद्धा मान्य करतात. सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकत देण्याची आमची भूमिका ठरली आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रभाग तेथे शाखा हे उद्दिष्ट मी साताऱ्यात ठेवले आहे. त्याच्या पूर्तीसाठी मला साताऱ्यात बोलवा मी तयार आहे.''

सामंत म्हणाले, ''शिवसैनिकांनी मेरिटचे संघटन कौशल्य राबवावे आणि निवडणुकीचे तिकिट मिळवावे अशी खुली ऑफर त्यांनी दिली. भाजपकडून महाविकास आघाडीवर वारंवार टीका होत आहे, या प्रश्नावर ते म्हणाले मुख्यमंत्री संयमी असून आमचे लक्ष विकासावर आहे. उत्तर आम्ही पण देऊ शकतो. या टीकेला साताऱ्यात महिला आघाडीने उत्तर दिले म्हणजे आघाडी सक्रिय नाही असे नाही, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून संघटनात्मक बांधणीचे पश्चिम महाराष्ट्रात काम सुरु आहे याचे परिणाम तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसतीलच याची ठाम ग्वाही, उदय सामंत यांनी दिली.

.

Related Stories

No stories found.