नगर जिल्ह्याचे दोन विद्यार्थी युक्रेनवरून परतले

अहमदनगर जिल्ह्यातील 25 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते.
Ahmednagar
AhmednagarSarkarnama

अहमदनगर - रशिया- युक्रेन मध्ये युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची भारतात परतण्यासाठीची धडपड सुरू आहे. पालक वर्गातही चिंतेचे वातावरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 25 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते. भारत सरकारने या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यातील दोन विद्यार्थी आज घरी परतले आहेत. ( Two students from the district returned from Ukraine )

रशिया-युक्रेन युद्धामुळे या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन विद्यार्थी पहिल्या विमानाने आले आहेत. भरत तोडमल आणि अविष्कार मुळे या दोघांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे यांनी दिली.

Ahmednagar
भारतीय विद्यार्थीनीचा युक्रेन सोडण्यास नकार; मी जगेल किंवा मरेल, पण...

रशिया - युक्रेन या दोन्ही देशामध्ये युद्धाला प्रारंभ झाला आहे. या दोन्ही देशात वैद्यकीय शिक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील 25 विद्यार्थी आहेत. भारत सरकाराने रशिया -युक्रेन देशातील भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. एअर इंडियाची खास विमाने पाठविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामधील विद्यार्थ्यांना विमानाने भारत आणण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना मुंबई येथील विमानतळावर आणण्यात आले. या पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भरत तोडमल आणि अविष्कार मुळे या दोघांचा समावेश आहे.

Ahmednagar
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा मोदींचा प्रयत्न! हेमा मालिनींचा गौप्यस्फोट

जिल्हा प्रशासनाचा मदत व सहाय्यक कक्ष

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती केंद्र, राज्य आणि नाशिक विभागीय आयुक्‍तांना पाठविली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या देखरेखीखाली नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे या कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com