शिक्षकांकडून 1 लाख 70 हजारांची लाच मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना जेलची हवा

शिक्षणासारखे पवित्रक्षेत्रही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहे. याचा प्रत्यय घडविणारी घटना सांगली जिल्हा परिषदेत घडली.
Sangali ZP
Sangali ZPSarkarnama

सांगली - शिक्षणासारखे पवित्रक्षेत्रही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहे. याचा प्रत्यय घडविणारी घटना सांगली जिल्हा परिषदेत घडली. शिक्षकांकडून 1 लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी व त्याच्या सहकाऱ्याला लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडत तुरुंगाचे दर्शन घडविले. ( Two officers arrested for demanding Rs 1 lakh 70 thousand from teachers )

माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय 58, रा. विश्रामबाग सांगली) व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे ( वय 41, रा. अहिल्यानगर कुपवाड) अशी दोघांची नावे आहेत शुक्रवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांचे सहकारी सोनावणे हे तब्बल 1 लाख 70 हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने जिल्हा परिषदमध्ये खळबळ उडाली आहे.

Sangali ZP
भाजप 27 टक्के उमेदवार ओबीसींचे देणार : महाविकास आघाडी देईल का?

तक्रारदार आणि त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळणे बाबत प्रस्ताव जिल्हा परिषदमधल्या शिक्षण अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. हे काम करून देण्यासाठी शिक्षणाधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांच्या दोन शिक्षक मित्रांकडे प्रत्येकी 60 हजार रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्या बाबतची तक्रार लाचलुचपत विभागाला देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली आणि लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाने कांबळे आणि सोनवणे यांच्या घरी सापळा रचून लाच स्वीकारत असताना या दोघांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com