एकनाथ शिंदेंना भेटलेले नगरचे दोन नगसेवक म्हणतात, आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरच

अहमदनगर महापालिकेतील सहा नगरसेवक दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आले.
Yogiraj Gade, Amol Yewle, Shashikant Gade
Yogiraj Gade, Amol Yewle, Shashikant GadeSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर महापालिकेतील शिवसेनेचे सहा नगरसेवक दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आले. त्यांनी एक निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले होेते. यावर एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरवरून हे शिवसेनेचे आजी, माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकच नगर शहरातील शिवसेनेत मोठी फुट पडल्याची सांगितले जात होते. Ahmednagar Shivsena News Update

या सहा नगरसेवकांत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजिव योगीराज गाडे व बंधू रमाकांत गाडे यांचा समावेश होता. मात्र आज नगरसेवक योगीराज गाडे व अमोल येवले यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरे यांच्या समवेत असल्याचे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य तथा उप जिल्हा प्रमुख संदेश कार्ले, शरद झोडगे, गिरीश जाधव, विक्रम राठोड आदी उपस्थित होते.

Yogiraj Gade, Amol Yewle, Shashikant Gade
नगरमधील शिवसेनेला खिंडार : जिल्हा प्रमुखाच्या चिरंजिवासह सहा नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला

योगीराज गाडे म्हणाले, मी जरी नगरसेवक असलो तरी राजकारणातून पैसे कमावत नाही. आमचे खासगी व्यवसाय आहेत. यात हॉटेल, ट्रान्सपोर्ट आदींचा समावेश आहे. ही आमची रोजीरोटी आहे. मी कोणात्याही नगरसेवकाच्या घरी गेलो नाही. मी माझ्या स्वतःच्या वाहनात अमोल येवले यांच्या सह खासगी व्यावसायिक कामा निमित्त व अहमदनगर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी गेलो होतो.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या स्वयंसहाय्यकाने जी वेळ दिली होती त्यावेळी गेलो होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील पक्षप्रवेशाचे काम सुरू होते. ते झाल्यावर आम्ही काही शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसमवेत निवेदन दिले. त्यानंतर मी तिथून निघून गेलो. मात्र मी व अमोल येवले दोघेही स्टेजवर अथवा त्यांच्या बरोबर बैठकीत चर्चेसाठी नव्हतो. मुख्यमंत्र्यांना निवेदन देणे हे गैर नाही. आम्ही दोघेही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेने बरोबरच आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Yogiraj Gade, Amol Yewle, Shashikant Gade
नगरचे शिवसेना नगरसेवक गेले मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला : म्हणाले हेच आमचे गुरू

निवेदन दिले त्यावर आमच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यावरून मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेला निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांनी शिंदे गटातच प्रवेश केला असे वाटले असावे. म्हणून ट्विटवर आमचा उल्लेख झाला. प्रत्यक्षात आम्ही शिंदे गटात प्रवेश केलेला नाही, असे योगीराज गाडे यांनी सांगितले.

अमोल येवले यांनी सांगितले की, मी योगीराज गाडे यांच्या बरोबर गेलो होतो. मात्र वाहनातून उतरलोच नाही. आम्ही पुरुषांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या. शिंदे गटाच्या समर्थन पत्रावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Yogiraj Gade, Amol Yewle, Shashikant Gade
शिवसेनेची स्थिती पाहून संजय पवार ढसाढसा रडले : म्हणाले, असे पोपट परत घेऊ नका

दोन दिवसांत पक्षप्रमुखांना अहवाल देणार

अहमदनगर महापालिकेतील नगरसेवकांबाबतचा अहवाल दोन दिवसांत मी पक्ष श्रेष्ठींना देणार आहे. यात योगीराज गाडे व अमोल येवले यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितले हे आज मी वरिष्ठांना कळविणार आहे. बाकीच्या नगरसेवकांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी दोन दिवस देत आहे, असे शशिकांत गाडे यांनी सांगितले.

मी मागील 18 वर्षांपासून जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहे. पक्षाने वेळोवेळी टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे बजावली आहे. मात्र गैरसजामुळे मुलाला लागलेला कलंक मनाला खटकला. तो शिंदे गटात नाही. तो उद्धव ठाकरे व शिवसेने बरोबरच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्षापत्र घेतले लिहून

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकऱ्यांकडून प्रतिक्षापत्र भरून घेतले जात आहे. या कामाचा प्रारंभ आज करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेत कोण व शिंदे गटात कोण हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

पती एका गटात पत्नी दुसऱ्या गटात?

एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सहा नगरसेवक गेलेले असले तरी शशिकांत गाडे यांनी केवळ दोनच नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. यात अनिल शिंदे व सुभाष लोंढे यांचा समावेश आहे. शिवाय शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष दिलीप सातपुतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे गाडे यांनी आज पत्रकार परिषदेत मान्य केले. मात्र अनिल लोखंडे यांच्या सारखे शिवसेना कार्यकर्ते शिंदे गटात असतील तर मग त्यांच्या पत्नी शिवसेनेत कशा? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.

आदित्य ठाकरे घेणार नगरसेवकांची बैठक

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे उद्या (ता.23) मेळावा घेणार आहेत. मात्र आदित्या ठाकरे हे अहमदनगर शहर, नगर तालुका, पारनेर व श्रीगोंद्यातील शिवसेना पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांशी शिर्डीत बैठक घेणार असल्याचे शशिकांत गाडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in